आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानचे नवे पंतप्रधान फुमियाे किशिदा शनिवारी सरकारी बंगल्यात राहायला गेले. जपानचे पंतप्रधान सरकारी निवासस्थानी स्थलांतरित झाल्याची ही दहा वर्षातील पहिलीच घटना आहे. कारण आहे या बंगल्याचा इतिहास. साेरी काेटाेई असे या बंगल्याचे नाव आहे. या बंगल्यात हत्या झाल्या आहेत. एवढेच नव्हे तर या बंगल्याची आेळखच भूतबंगला अशी झाली. पंतप्रधान शिंजाे अॅबे यांना माजी पंतप्रधान याेशिहिराे माेरी यांनी बंगल्यात भूत असल्याचे सांगितले हाेते. स्वत: भूत बघितल्याचा दावा त्यांनी केला हाेता. परंतु नवीन पंतप्रधान किशिदा यांची या बंगल्यात वास्तव्याला जाण्याची भूमिका वेगळी आहे. ते म्हणाले, या बंगल्यात राहत असल्याने सरकारी कामकाजावर जास्त एकाग्रतेने लक्ष घालू शकेन.
या बंगल्यात याेशिहादे नाेदा २०१२ पर्यंत राहिले हाेते. मात्र नंतर ते टाेकियाेजवळील शिबुयाजवळ आपल्या खासगी निवासस्थानी राहत हाेते. २००५ मध्ये तांत्रिकाला बाेलावून काही विधी करण्यात आले हाेते. १९२३ च्या भीषण भूकंपानंतर हे निवासस्थान उभारण्यात आले हाेते. १९३२ मध्ये एका नाैदल अधिकाऱ्याने या निवासस्थानी घुसून पंतप्रधान इनुकाई यांची हत्या केली हाेती. १९३६ मध्ये येथे झालेल्या गाेळीबारात ५ जणांचा मृत्यू झाला हाेता.
घराच्या देखरेखीवर १० काेटींचा खर्च
५५ हजार ७८९ चाैरस फूट क्षेत्रफळ भागातील सरकारी निवासस्थानाच्या देखभालीसाठी १० काेटींचा खर्च येताे. गेल्या एका दशकापासून या निवासस्थानी काेणतेही पंतप्रधान राहत नव्हते. अमेरिकेतील आर्किटेक्ट फ्रँक राइट यांनी त्याचे डिझाइन केले हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.