आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजपानने चीनला उत्तर काेरियापेक्षा सर्वात मोठा धोका मानत आपली सुरक्षा रणनीती ९ वर्षांनंतर अपडेट केली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ही सर्वात मोठी लष्करी तयारी आहे. पहिल्यांदाच अनेक दशकांचे नियंत्रण संपुष्टात आणत जपानी मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात लष्करी खर्च दुप्पट केला आहे. लष्करी खर्च जीडीपीच्या एक टक्क्यावरून वाढवत २ टक्के केल्यानंतर जपान नाटो देशांच्या रांगेत येईल. नव्या सुरक्षा दस्तऐवजानुसार खर्चात येत्या पाच वर्षांत ३१५ अब्ज डॉलर किंवा ४३ लाख कोटी येनची वाढ होईल.
२०२७ पर्यंत एकूण वार्षिक खर्च ८० अब्ज डॉलर होईल. जपानच्या नव्या सुरक्षा धोरणात चीनला मोठी रणनीतीक आव्हान मानत आहे. यासोबत रशियाबाबत कठोर भूमिका अंगिकारत आहे. एका दशकाआधी सुरक्षा दस्तऐवजात त्याने चीन आणि रशियाला रणनीतीक भागीदार म्हटले होते. उ. कोरियाला प्रमुख धोका मानला होता. अमेरिकेच्या कृपादृष्टीतून बाहेर पडण्याच्या तयारीचे हे संकेत मानले जातात. अमेरिका आणि जपान यांच्यात लष्करी करार आहे,ज्याअंतर्गत जपानविरुद्ध युद्धात अमेरिकाही त्याच्या बचावासाठी येईल. जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्या म्हणण्यानुसार, शेजारी देश आणि प्रदेशात जबरदस्तीने एकतर्फी जैसे थे स्थिती बदलण्याचा कल दिसत आहे. जपान इतिहासाच्या नव्या वळणावर आहे,त्यात आता लष्करी तयारीची गरज आहे.
लष्करी ताकद वाढवण्याच्या विचाराला अनेक दशकांपर्यंत विरोध झाल्यानंतर युक्रेनवरील रशियाचा हल्ला आणि तैवानवरून चीनच्या आक्रमक भूमिकेत अलीकडच्या निवडणुकांत देशातील निम्म्याहून अधिक लाेकांनी लष्करी तयारीचे समर्थन केले आहे.
तैवानच्या संघर्षाचा थेट परिणाम जपानवर जपान आपली शस्त्र प्रणाली पूर्णपणे तयार होईपर्यंत अमेरिकेकडून १००० क्षेपणास्त्र प्राप्त करत आहे. तैवान नजीकच्या बेटावर तटबंदी सुरू केली आहे. क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या सुरक्षा प्रणालीवर गुंतवणुकीची योजना आहे, त्याद्वारे चीन आणि उ. कोरियातून येणारी क्षेपणास्त्रे रोखली जाऊ शकतील. इटली आणि ब्रिटनसोबत मिळून पुढील पीढीच्या लढाऊ विमानांची निर्मिती केली जाईल. अमेरिकी हाउस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर चीनने ऑगस्टमध्ये प्रत्युत्तरात क्षेपणास्त्रे डागली होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.