आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
३८ वर्षांची युकारी कोकई बाल्कनीतून बर्फ हटवत आहे. रात्री झालेल्या वादळामुळे तिच्या घराचा खालचा भाग बर्फात दबला आहे. ३ मीटर उंच बर्फ साचल्याचे ती सांगते. हे सामान्य वादळ आहे. यापेक्षाही मोठी वादळे मी पाहिली आहेत. उत्तर जपानच्या निगाता प्रांतातील हे टोकामाची शहर आहे. ५३ हजार लोकसंख्येच्या या शहरात दरवर्षी १२ मीटर बर्फवृष्टी हाेते. हारादाऱ्या गेस्ट हाऊसची मालकीण मिशी कोसुगा सांगते, बर्फवृष्टी सामान्य आहे. यामुळे आयुष्य थांबत नाही. शाळा, दुकाने व हॉट स्प्रिंग वेळेवर उघडतात. मात्र, कोरोनाने पर्यटकांना हिरावून नेले. टोकामाची पर्यटक माहिती केंद्रात काम करणारी नत्सुकी यामागीशी सांगते, लहानपणापासून ही थंडी आम्ही पाहत आलो आहोत. हा हंगाम जीवघेणा असतो.
बर्फवृष्टीमुळे घर कोसळल्याने बहुतांश अपघात होतात. हंगामातील पहिल्या बर्फवृष्टीच्या अंदाजानुसार आम्ही तयारीला सुरुवात करतो. बहुतांशी लोक बर्फात घसरू नये म्हणून थंडीत साखळी किंवा विशेष स्टडचे टायर असलेल्या चारचाकीतून प्रवास करतात. कडक थंडीत गाडीही लवकर सुरू होत नाही. यामुळे अनेक जण रस्त्यात रात्रभर अडकून पडतात. शहरातील मुख्य मार्गांवर बर्फ साफ करण्यासाठी लाखो टन मीठ पसरवले जाते तरीही या हंगामात या भागात सहज जाता येते. टोकियोहून हाय स्पीड बुलेट ट्रेन केवळ तीन तासांत आेमोरीला पोहोचवते. हवाई मार्गानेही जाता येते. टोकियोतून आेमोरी, निगातासाठी २० पेक्षा जास्त उड्डाणे आहेत. हे बर्फ हटवणाऱ्या टीममुळे शक्य होते. ते एका दिवसात अनेक वेळा रनवेवरून बर्फ हटवतात. दोन दशकांपासून रनवेवर बर्फ असला तरी एकही उड्डाण रद्द झाले नाही किंवा उशिरा झाले नाही. असे टीमचे सदस्य देईशुके सइतो सांगतात. ओमोरी, टाकामोची शहरात बर्फ हटवण्यासाठी दरवर्षी २६०-२८० कोटी रुपये खर्च होतात. एप्रिलमध्ये रस्त्यावरुन बर्फ हटवल्यानंतर बर्फाचा २६ मीटर उंच ढीग तयार होतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.