आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन लक्ष्य:चिनी कर्जाच्या जाळ्यातून आशियाला जपान वाचवणार

टोकियोहून / ज्युलियन रयालएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या कर्जाच्या जाळ्यातून वाचवण्यासाठी जपानमधील नवीन सरकारने एक व्यापक याेजना आखली आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षेला राेखण्यासाठी जपानने आपल्या सुदृढ अर्थव्यवस्थेलाच शस्त्र बनवले आहे. त्याचाच भाग म्हणून जपानने सर्वप्रथम चिनी कर्जाखाली दबलेल्या श्रीलंकेला वर्षाखेरीस चर्चेचे निमंत्रण दिले आहे. श्रीलंकेवर चीनचे ६० हजार ७५६ काेटी रुपयांचे कर्ज आहे. ते लंकेवरील एकूण परदेशी कर्जाच्या ५२ टक्के आहे. टाेकियाे विद्यापीठातील प्राेफेसर हिनाटा-यामागुची म्हणाले, चीन आपल्या कर्ज धाेरणावर खूप पुढे गेला आहे. जपानसाेबतच्या बैठकीतून श्रीलंकेला कर्जाच्या आणखी गर्तेत अडकू दिले जाणार नाही. साेबतच इतर देशांना सतर्क करण्याचाही उद्देश आहे. सोलोमन आयलँडही कर्जासाठी चीनसोबत चर्चा करत आहे.

श्रीलंकेने कर्जापायी गमावले हंबनटाेटा बंदर जपानने श्रीलंकेला चीनकडून कर्ज घेण्यापूर्वी अनेक वेळा इशारा दिला हाेता, परंतु श्रीलंकेच्या सरकारने चीन सरकारकडून हंबनटाेटा बंदर गहाण ठेवून ९ हजार १३० काेटींचे कर्ज घेतले हाेते. श्रीलंकेने हे पैसे फेडले नाही. २०१७ मध्ये एका चिनी कंपनीने बंदराला ९९ वर्षांच्या लीजवर घेतले.

नेपाळला सल्ला : रेल्वे रूळ करार करू नये चीन ट्रान्स-हिमालयन रेल्वे मार्ग ल्हासा-काठमांडू जाेडू इच्छिते. नेपाळमध्ये ७० किमीच्या रुळाचा खर्च ३९ हजार ८४० काेटी रुपये आहे. जपानच्या सँकई वृत्तपत्रानुसार जपान सरकारने नेपाळसाेबत उच्चस्तरीय बैठकीतून चीनचे कर्ज घेऊ नये असा सल्ला दिला.

पाकचा माेह कायम, पैशांची देवाण-घेवाण करणार पाकिस्तानचे चीन प्रेम कायम आहे. पंतप्रधान शाहबाज यांनी अलीकडेच चीन दाैऱ्यात चिनी चलन युआनमध्ये देवाण-घेवाण करण्याचा प्रस्ताव दिला. सीपॅक प्रकल्पांतर्गत हा निर्णय आहे.

बातम्या आणखी आहेत...