आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जापान:आजारपणामुळे जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी दिला राजीनामा; म्हणाले- आजारामुळे कामावर परिणाम होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला

टोकियो5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिंजो आबे 2803 दिवस पंतप्रधान पदावर होते, यापूर्वी हा रेकॉर्ड त्यांचे काका इसाकु सैतो यांच्या नावावर होता

जापानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की- पंतप्रधान पदाचे अजून एक वर्ष बाकी आहे आणि अनेक गोष्टी पूर्ण करणे बाकी आहे. परंतू, माझ्या आजारपणामुळे कामावर परिणाम पडू नये, यासाठी मी हा निर्णय घेत आहे. 65 वर्षी आबे यांना पोटाशी संबंधित आजार आहे. या महिन्यात त्यांना दोन वेळा हॉस्पीटलमध्ये जावे लागले होते.

शिंजो यांनी या महिन्यात पंतप्रधान पदावर 7 वर्षे 6 महीन्याचा कार्यकाळ पूर्ण केला होता. आबे 2803 दिवसांपासून या पदावर आहेत, यापूर्वी हा रेकॉर्ड त्यांचे काका आणि जापानचे माजी पंतप्रधान इसाकु सैतो यांच्या नावावर होता. शिंजो लिबरल डेमोक्रेटिक पार्टी(एलडीपी) चे सदस्य आहेत.

शिंजो यांना आतड्याशी संबंधित आजार आहे

शिंजो यांना अनेक दिवसांपासून आतड्याशी संबंधित 'अल्सरट्रेटिव कोलाइटिस' नावाचा आजार आहे. या आजारात आतड्यावर सूज येते. याच आजारामुळे शिंजो यांना 2007 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser