आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशास्त्रज्ञांनी दोन जैविक पित्यांपासून एका उंदराला जन्माला घालण्यात यश मिळवले आहे. प्रजननशास्त्रात हे क्रांतिकारी संशोधन असल्याचे म्हटले जात आहे. जपानच्या ओसाका युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञा कात्सुहिको हयाशी यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या टीमने दोन नर उंदरांच्या त्वचेच्या पेशींपासून एग्ज मिळवले आणि ते मादी उंदरात इम्प्लांट केले होते. या मादीने नंतर निरोगी पिल्ल्यांना जन्म दिला आहे. 15 मार्च रोजी नेचर जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
भविष्यात वंध्यत्वावर करता येईल मात
या संशोधनामुळे भविष्यात वंध्यत्वावर मात करता येईल. तसेच हे समलिंगींसाठीही महत्त्वाचे संशोधन ठरू शकते, असे म्हटले जात आहे. याच पद्धतीचा वापर करून नामशेष होत चाललेल्या प्राण्यांच्या पुनरात्पादनालाही चालना मिळू शकते.
तथापि, शास्त्रज्ञांनी इशाराही दिला आहे की, मानवी पेशींपासून मूल जन्माला घालण्याच्या या तंत्रज्ञानाचा पुष्कळ अभ्यास करावा लागणार आहे. मानवांमध्ये या पद्धतीचा वापर व्हायला प्रदीर्घ काळ लागणार आहे. आणि जरी आपण हे तंत्र वापरले तरी यातून सुरक्षितरीत्या मानवांची मुले जन्माला येतील की नाही, हे आपल्याला सांगता येणार नाही, डॉ. हयाशी यांनी ही माहिती दिली आहे.
प्रयोगशाळेतील उंदराच्या त्वचेपासून घेतल्या पेशी
संशोधकांनी एका प्रयोगशाळेतील प्रौढ उंदराच्या शेपटीच्या त्वचेपासून या पेशी घेतल्या होत्या. या भागात मानवातील पुरुषासारखेच x आणि y क्रोमोझोम्स म्हणजेच गुणसूत्रे असतात. या पेशींना त्यांनी प्लुरिपोटेंट स्टेम सेलमध्ये कन्व्हर्ट केले. त्यांना IPSC असेही म्हणतात. या प्रकारचे स्टेम सेटल शास्त्रज्ञांनी भ्रूणावस्थेत रिप्रोग्राम केले.
सर्वप्रथम नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली पद्धत
वैशिष्ट्यपूर्ण जीन्स मिळवण्यासाठी एका पेशीपासून एम्ब्रियॉनिक स्टेम सेल तयार करण्याची जेनेटिक इंजिनिअरिंगची ही प्रक्रिया नोबेल विजेते शास्त्रज्ञ शिनिया यामानाका यांनी विकसित केली आहे.
जपानी शास्त्रज्ञांनी मादी उंदरांमध्ये केलेल्या 630 इम्प्लांटपैकी 7 मधून उंदरांचा जन्म झाला आहे. डॉ. हयाशी म्हणाले की, हा अतिशय कमी सक्सेस रेट आहे.
या तंत्रज्ञानामुळे पुढे कोणत्या शक्यता?
हयाशी यांच्या या संशोधनामुळे अपत्याची इच्छा असणाऱ्या समलिंगी व्यक्तींसाठी एक शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात केव्हा ना केव्हा समलिंगी पालकांना असे अपत्य जन्माला येईल ज्याच्यात दोन्ही पालकांचे गुणसूत्र असतील.
हयाशी म्हणाले की, पुरुष-पुरुष जोडीदारात मूल जन्माला घालण्यात तांत्रिक आणि नैतिक अडचणी आहेत. तथापि, या संशोधनात जसे आढळून आले, तसे थेअरॉटिकली हे शक्य आहे.
ते पुढे म्हणाले की, दुसरीकडे, यात असेही आव्हान आहे की, स्त्री-स्त्री जोडीदारांमधून तशीच प्रक्रिया घडवणे अशक्य वाटते. कारण स्त्रीयांमध्ये X आणि Y पैकी Y क्रोमोझोमचा अभाव असतो. आणि स्पर्म निर्मितीसाठी ते आवश्यक असते. यामुळे पुरुषांतील एक्स क्रोमोझोमचे प्रतिरूप तयार करणे सहज शक्य आहे.
संशोधनामुळे अनेक जटिल प्रश्न
दरम्यान, हार्वर्ड लॉ स्कूलच्या प्राध्यापिका ग्लेन कोहेन यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, या संशोधनामुळे अनेक कायदेशीर आणि नैतिक प्रश्नही निर्माण केले आहेत. यावर समाजाने विचार करायला सुरुवात करायला हवी. यात एम्ब्रियो फार्मिंग- ज्यात सर्वोत्तम निवडण्यासाठी शंभराहून अधिक एम्ब्रियो जन्माला घातले जातात. आणि एखाद्या व्यक्तीच्या पेशींचा अनधिकृत वापर, असेही गंभीर प्रश्न आहेत.
जर जन्माला घातलेल्या अनेक एम्ब्रियोंपैकी अनेकांचा वापरच झाला नाही तर यामुळे भविष्यातील अनेक मनुष्य जीवांची हत्या होणार नाही का? असा सवालही त्यांनी केला आहे. तथापि, प्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसेच याबाबतीतही आहे. या तंत्रज्ञानामुळे नामशेष होत चाललेल्या अनेक प्राण्यांना पुन्हा अस्तित्वात आणता येणे शक्य होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.