आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहवामान बदल जगासाठी सर्वात मोठे आव्हान आहे. अशा वेळी जपानचे एक छोटे शहर जगासाठी उदाहरण ठरत आहे. येथील कामिकत्सू पालिका २००३ मध्ये जपानचे पहिले कचरामुक्त क्षेत्र म्हणून जाहीर झाले. २०३० पर्यंत या ठिकाणाला कार्बन न्यूट्रल बनवण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करण्यासाठी इथे ८० टक्के कामही पूर्ण झाले आहे. या भागातील लोक येथील उद्योगांसोबत मिळून जास्तीत जास्त पुनर्वापर होऊ शकणाऱ्या पदार्थांचा वापर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतात. कचरा होण्यापासून व तो जाळण्यापासून रोखणे हा उद्देश आहे. शहरातील हॉटेलही गरजेपुरत्या वस्तुंचाच वापर करतात. चेक इन करतेवेळी पाहुणे अतिरिक्त सामान कमी करू शकतात. मोठ्या व्यापाऱ्यांसोबतच सामान्य व्यक्तीही अन्न नासाडी होऊ देत नाही. इतकेच नाही तर ताटामध्ये सजावटीसाठी वापरण्यात येणारी पानेदेखील शहरातूनच घेतली जातात. ही पाने जपानशिवाय आशियातील इतर देशांनाही शाश्वत सजावटीचे सामान म्हणून पाठवले जातात. या शहराच्या लोकांना कधी बाहेर जायचे असेल तर भागीदारीतच ते वाहनांचा वापर करतात. कचरामुक्तीसाठी अवलंबण्यात येणाऱ्या पद्धतींचा मोठ्या शहरांमध्येही अंगीकार करण्यात आला आहे. शहराच्या रीसायकलिंग फॅसिलिटीमध्ये कचऱ्याची ४५ श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. यात कागदापासून बनलेल्या वस्तु वेगळ्या करण्यासह एकूण ९ पद्धती आहेत.
पुनर्वापरामुळे किती पैसे वाचतील हे लोकांना सांगतात
लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुनर्वापराची पद्धत आहे. यात वस्तु इको फ्रेंडली सामानसोबत बदलल्या जातात. रिसायकल वस्तुंपासून तयार होणारी चित्रेदेखील बनवली आहेत. यामुळे शहराचा किती पैसा वाचेल, याची माहिती दिली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.