आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया-युक्रेन युद्धानंतर जपानही स्वतःच्या सुरक्षेप्रती सजग झाला आहे. जपानच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटीक पार्टीने (एलडीपी) एक महत्वाची घोषणा केली आहे. एलडीपी आता देशात न्यूक्लियर वेपन्स अर्थात अण्वस्त्रे विकसित व तैनात करण्याची शक्यता पडताळून पाहण्यावर चर्चा घडवून आणणार आहे. दुसऱ्या महायुद्धात अणुहल्ला सहन करणाऱ्या जपानमध्ये प्रदिर्घ काळापासून 3 नॉन न्यूक्लियर तत्वांचे पालन करण्यात येत आहे. पण, आता जपानला पूर्व युरोपातील युद्धामुळे देशाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आल्याचे वाटते. या ठिकाणी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन संघर्षापासून अन्य देशांना दूर ठेवण्यासाठी आपली अण्वस्त्र यंत्रणा हाय अॅलर्टवर ठेवली आहे. त्यामुळे जपानला आता आपल्या शेजाऱ्यांचीही चिंता सतावत असून, यात चीनचाही समावेश आहे.
शेजारी देशांकडे न्यूक्लियर वेपन्स
चीनने अत्यंत वेगाने अण्वस्त्रे तैनात करुन अनेक शेजारी देशांच्या भूभागावर वक्रदृष्टी टाकली आहे. तसेच तैवानवरही नियंत्रण प्रस्थापित करण्याचा आपला मानस व्यक्त केला आहे. आणखी एक शेजारी उत्तर कोरियानेही स्वतःची अण्वस्त्रे विकसित केली आहेत. या कारणांमुळे बुधवारी जपानची राष्ट्रीय सुरक्षा हाताळणाऱ्या एलडीपीच्या सदस्यांची येथे एक बैठक झाली. त्यात तज्ज्ञांचे मत जाणून घेतले जात आहे.
माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी न्यूक्लियर-शेयरिंग प्रोग्रामवर भाष्य केले
जपानचे माजी पंतप्रधान शिंजे आबे प्रदिर्घ काळापासून न्यूक्लियर वेपन्स तयार करण्याचे समर्थन करत आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या देशाने अण्वस्त्रांवरील निर्बंध मागे घेवून ते तयार करण्याविषयी पुन्हा सक्रिय चर्चा सुरु करण्याची मागणी केली होती. ‘जपानने नाटोच्या धर्तीवर संभाव्य न्यूक्लियर शेयरिंग प्रोग्राम तयार करावा’, असे ते म्हणाले होते.
जपानने अण्वस्त्र प्रसार बंदीवर स्वाक्षरी केली आहे. जपानचे 3 नॉन न्यूक्लियर तत्वे आहेत. पण, जग कसे सुरक्षित राहू शकते? यावर चर्चा करण्यासाठी यात कोणतीही मनाई करण्यात आली नाही. युक्रेनने सोव्हियत यूनियनहून विभक्त होताना सुरक्षेच्या हमीसाठी काही अणुबॉम्ब आपल्याकडे ठेवले असते तर कदाचित त्याला रशियन हल्ल्याचा सामना करावा लागला नसता.
पंतप्रधान फुमियो यांचे विचार माजी पंतप्रधानांहून वेगळे
हिरोशिमातून निवडून आलेले जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी जपानसाठी न्यूक्लियर वेपन्स सामायिक करण्याची व्यवस्ता पुढे सरकवणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर पक्षाच्या जनरल काउंसिलचे अध्यक्ष तत्सुओ फुकुदा यांनी आपले नागरिक व देशाच्या संरक्षणासाठी कोणत्याही चर्चेपासून मागे न हटण्याची भूमिका घेतली आहे.
1967 मध्ये तयार झाले होते 3 नॉन न्यूक्लियर प्रिंसिपल्स
जपानची 3 नॉन न्यूक्लियर तत्वे आहेत. 1967 साली ते सर्वप्रथम निश्चित करण्यात आले होते. त्या अंतर्गत देशात अण्वस्त्रे तयार करणे व बाळगण्यावर बंदी आहे. जपानचे नागरिकही अण्वस्त्रांच्या विरोधात आहेत. पण, शिंजो आबे यांनी नाटोच्या धर्तीवर शेयरिंगच्या पर्यायावर भाष्य करुन या मुद्याला हात घातला आहे. ‘जपानचे बहुतांश लोकांना ही व्यवस्था माहिती नाही. अण्वस्त्रे नष्ट करण्याचे लक्ष्य महत्वाचे आहे. पण, जेव्हा जपानच्या नागरिकांचे प्राण व देश वाचवण्याची गोष्ट येते तेव्हा आपण अनेक पर्यांयावर विचार करावा असे मला वाटते’, असे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.