आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅनडात पंजाबींना झटका:पंतप्रधान ट्रूडो यांनी मालमत्ता खरेदी करण्यावर घातली बंदी; आता घर खरेदी करता येणार नाही

ओट्टावाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच देशातील पंजाबी नागरिकांना जोरदार झटका दिला आहे. भारतीयांसह कॅनडात येणाऱ्या कोणत्याही नागरिकांना आता तिथे मालमत्ता खरेदी करता येणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली आहे. विशेष म्हणजे कॅनडाने यापूर्वी स्टडी व पी आर व्हीसाचे असंख्य अर्ज फेटाळून संबंधितांना जोरदार झटका दिला होता.

घरांच्या तुटवड्याचा सामना करणाऱ्या कॅनडाने परदेशी नागरिकांवर निवासी मालमत्ता खरेदी करण्यास बंदी घातली आहे. ही बंदी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ही बंदी लागू झाली आहे. हा नियम केवळ शहरी भागातील घरांवरच लागू असेल. हे निर्बंध उन्हाळी कॉटेजसारख्या मालमत्तांना लागू होणार नाहीत, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

2021 च्या निवडणुकांवेळी ठेवला होता प्रस्ताव

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी 2021 च्या निवडणूक मोहिमेवेळी नागरिकांच्या सुविधेसाठी मालमत्तेचा हा प्रस्ताव सादर केला होता. देशातील घरांच्या वाढत्या किंमतीमुळे घर खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. परिणामी स्थानिकांना फायदा पुरवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

कॅनडात घर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली

कॅनडात घर खरेदी करण्याची मागणी गत काही वर्षांपासून चांगलीच वाढली आहे. लोक कॅनडात मालमत्ता खरेदी करण्यासाठी उतावीळ झालेत. हे पाहता सरकारने यापूर्वीच घर गुंतवणूकदारांसाठी नव्हे तर नागरिकांसाठी आहे असे स्पष्ट केले होते. सरकारने बिगर कॅनडीयन अधिनियमांतर्गत निवासी मालमत्ता खरेदी करण्यावर बंदी घातली आहे.

बातम्या आणखी आहेत...