आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:दुचाकीस्वार पडल्यास जीन्स, जॅकेट होतील एअरबॅग; देशातील अपघातांमध्ये 37 टक्के मृत्यू बाइकचालकांचे

ऑर्लियन्स (फ्रान्स)/नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एअरबॅग जीन्सची सुरू आहे क्रॅश टेस्ट, पुढील वर्षी बाजारात येणार

सुरक्षा कवच नसताना दुचाकीवर संतुलन ठेवणे कार चालवण्याच्या तुलनेत जास्त धोकादायक आहे. आकडेवारीतूनही तेच दिसते. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयानुसार भारतात सन २०१९ मध्ये प्रत्येक तासाला सहा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण ३७ टक्के आहे.

फ्रान्सचे अभियंते मोसेस शाहरिवार यांची एअरबॅग जीन्स दुचाकीस्वारांसाठी आशेचा किरण आहे. त्यांनी अशी सुपर स्ट्राँग जीन्स बनवली आहे, जिच्यात एअरबॅग आहे. चालक ही जीन्स घालून वाहन चालवताना पडल्यास एअरबॅग कॉम्प्रेस्ड एअरने भरेल. यामुळे शरीराला मार कमी लागतो. वायू भरून ती पुन्हा वापरता येईल अशा प्रकारे एअरबॅग बनवण्यात आली आहे. एअरबॅग जीन्सला युरोपीय युनियनच्या हेल्थ अँड सेफ्टी स्टँडर्डद्वारे प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू असून अनेक क्रॅश टेस्ट केल्या जात आहेत.

२०२२ पर्यंत ती बाजारात येण्याची आशा आहे. शाहरिवार यांच्यानुसार पहिल्यांदाच शरीराच्या खालच्या भागाला अशा प्रकारची सुरक्षा मिळेल. तसेच वरच्या भागासाठीही एअरबॅग जॅकेट लवकरच बाजारात आणण्याचे प्रयत्न आहेत. दुसरी एक कंपनी ऑटोनॉमस इलेक्ट्रॉनिकने अशीच एअरबॅग तयार केली आहे. चालक पडल्यास तिच्यातील हायटेक सेन्सर सक्रिय होत एअरबॅग उघडतील. दुसरी एक फ्रेंच फर्म इसएंडमोशनने जीपीएस, झायरोस्काेप आणि अॅक्सिलेरोमीटरद्वारे ‘ब्रेन’ बनवला आहे. स्मार्टफोनपेक्षा थोडा मोठा हा बॉक्स पाठीवर घातला जातो. त्याचा सेन्सर दुचाकीस्वाराची प्रत्येक क्षणाची हालचाल प्रत्येक सेकंदात १ हजार वेळा मोजतो. यूकेतील लाफबरो विद्यापीठाचे वरिष्ठ व्याख्याते रिचर्ड फ्राम्पटन यांच्यानुसार मोटारसायकल एअरबॅग कारच्या एअरबॅगप्रमाणे दुचाकीस्वाराचे रक्षण करते. ती एक क्रांती ठरेल.

बातम्या आणखी आहेत...