आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:चंद्रावर स्वारी करण्याच्या स्पर्धेत वरचढ मस्कना बेजोस यांनी पत्रातून केला विरोध; मस्क यांचेही प्रत्युत्तर- ही मोहीम तुमच्या आवाक्याबाहेरची!

कॅनेथ चॅँग10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीने नासाकडून 22 हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळवले

जेफ बेजोस आणि एलन मस्क या जगातील सर्वात दोन श्रीमंत व्यक्ती चंद्रावर जाण्याची लढाई लढत आहेत. हे प्रकरण २२ हजार कोटी रुपयांच्या कंत्राटाचे आहे, ते अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीला दिले आहे. त्याअंतर्गत स्पेस एक्स एक लँडर तयार करेल, त्यातून अमेरिकेचे अंतराळवीर २०२४ मध्ये चंद्रावर जातील. या प्रकल्पासाठी स्पेस एक्सव्यतिरिक्त आणखी दोन कंपन्यांनी बोली लावली होती. त्यापैकी एक जेफ बेजोस यांची ‘ब्ल्यू ओरिजिन’ही होती.

साेमवारी बेजोस यांच्या कंपनीने नासाच्या या निर्णयाविरुद्ध अमेरिकी सरकारला ५० पानांचे विरोधाचे पत्र दिले. ब्ल्यू ओरिजिनचे चीफ एक्झिक्युटिव्ह बॉब स्मिथ म्हणाले,‘नासाचा स्पेस एक्सला कंत्राट देण्याचा निर्णय चुकीचा आहे, कारण त्यांनी आमच्या प्रस्तावातील फायदेशीर पैलूकडे दुर्लक्ष तर केलेच, शिवाय स्पेस एक्सच्या तांत्रिक उणिवांकडेही दुर्लक्ष केले.’ त्यावर मस्क यांनी सोशल मीडियावर बेजोस यांच्यावर टीका करताना म्हटले,‘ विरोधाचे पत्र दिल्यानंतर ते चंद्राच्या कक्षेपर्यंतही जाऊ शकणार नाहीत. राहू द्या, हे तुमच्यासाठी अशक्यप्राय आहे.’

चंद्रावर जाण्यासाठी नासाला एक अंतराळ यान तयार करायचे आहे, त्या माध्यमातून प्रथमच एक महिला आणि कृष्णवर्णीय पुरुष चंद्रावर जातील. १९७२ नंतर अमेरिकेने चंद्रावर कोणत्याच माणसाला पाठवलेले नाही. नासाचे प्रशासक जिन ब्रिडेनस्टाइन म्हणाले की, २०२४ मध्ये चंद्रावर जाण्यासाठी नासाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. २०२४ मध्ये ओरायन नावाच्या अंतराळयानात ४ सदस्य अंतराळाच्या कक्षेत जातील. तेथून दोन अंतराळवीर स्पेस एक्सच्या यानात बसून चंद्रावर जातील. योजनेनुसार दोन अंतराळवीर एक आठवडाभर चंद्राच्या पृष्ठभागाच्या चाचण्या घेतील आणि स्पेस एक्सच्या यानाद्वारेच पुन्हा ओरायनपर्यंत पोहोचतील. हे यान ४ लाख ५० किमीचा प्रवास करून तीन आठवड्यांत चंद्रापर्यंत पोहोचेल.

२०२८ पर्यंत चंद्रावर मानवासाठी कायमस्वरूपी ठिकाण बनवण्याची योजना
आर्टिमिस मिशनद्वारे २०२८ पर्यंत मानवासाठी कायमस्वरूपी ठिकाण बनवण्याची व्यवस्था तयार करण्याची नासाची योजना आहे. एलन मस्क यांच्या स्पेस एक्स या कंपनीने या प्रकल्पासाठी २२ हजार कोटी रुपये आणि जेफ बेजोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन या कंपनीने जवळपास ४५ हजार कोटी रुपयांची बोली लावली होती.

बातम्या आणखी आहेत...