आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Jeff Bezos Space Travel LIVE Video Update; Texas News | Blue Origin Space Flight Launch Latest Today, Jeff Bezos

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची अंतराळ यात्रा:अमेझॉनचे संस्थापक बेझोस यांची पहिली अंतराळ यात्रा यशस्वी, 3 प्रवाशांसोबत 11 मिनिटांमध्ये पूर्ण केला 105 किमी.चा प्रवास

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 52 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नील आर्मस्ट्रॉन्ग चंद्रावर पोहोचले होते

जगातील अव्वल ई-कॉमर्स कंपन्यांपैकी एक असलेल्या अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस अंतराळातील 11 मिनिटांच्या प्रवासानंतर पृथ्वीवर परतले. ते मंगळवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:42 वाजता निघाले. त्याच्यासोबत आणखी 3 प्रवासी होते. त्यापैकी एक त्यांचा भाऊ मार्क, 82 वर्षीय वॅली फंक आणि 18 वर्षीय ऑलिव्हर डॅमन यांचा समावेश आहे. ऑलिव्हरने नुकतीच हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. बेझोससमवेत अवकाशात जाण्यासाठी अज्ञात व्यक्तीने 28 दशलक्ष डॉलर्सची बोली लावली होती. या ट्रिपमध्ये तो जाऊ शकला नाही. ऑलिव्हर त्याच्या जागी गेला होता.

कॅप्सूल पृथ्वीवर लँड केल्यानंतर ब्लू ओरिजिनकडून म्हटले गेले की, स्पेसफ्लाइट इतिहासात या ऐतिहासिक क्षणापर्यंत पोहोचल्याबद्दल टीम ब्लू पास्ट आणि सर्व लोकांचे अभिनंदन. पहिले ऐस्ट्रोनॉट क्रूने आपले नाव स्पेसच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिले आहे. त्यांनी जो दरवाजा उघडला आहे, आता त्यातून बरेच लोक जातील. हा खरेच ऐतिहासिक दिवस आहे.

52 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी नील आर्मस्ट्रॉन्ग चंद्रावर पोहोचले होते
रिपोर्ट्सनुसार, बेझोस यांनी अवकाशात जाण्यासाठी हा दिवस निवडला आहे कारण अपोलो 11 स्पेसशिपच्या माध्यमातून एस्ट्रोनॉट्स नील आर्मस्ट्रॉन्ग आणि बज एल्ड्रिन आजच्या बरोबर 52 वर्षांपूर्वी 1969 मध्ये चंद्रावर पोहोचले होते. जेफ बेझोसची स्पेसफ्लाइट कंपनी ब्लू ओरिजिनने रविवारी म्हटले होते की, ते आपल्या पहिली ह्यूमन स्पेसफ्लाइटसाठी पूर्णपणे तयार आहेत.

बेझोस आणि त्यांची टीम ज्या रॉकेट शिपने गेले होते, ती ऑटोनॉमस आहे म्हणजे त्याला पायलटची आवश्यकता नाही. त्याच्या कॅप्सूलमध्ये 6 सीट आहेत, परंतु यापैकी केवळ 4 जागा भरल्या गेल्या. आतापर्यंत न्यू शेफर्ड नावाच्या या रॉकेटची 15 उड्डाणे यशस्वी झाली आहेत. अद्यापत यामध्ये आतापर्यंत प्रवासी गेले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...