आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जगातील अव्वल ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक व जगातील दुसरे सर्वश्रीमंत जेफ बेजोस या वर्षी कंपनीचे सीईओपद सोडतील. ५७ वर्षीय बेजोस यांनी मंगळवारी ही घोषणा केली. अँडी जेसी नवे सीईओ असतील, असेही जाहीर केले. १९९४ मध्ये एका दौऱ्यात कंपनी स्थापन करण्याचा निर्धार केला. त्यानंतर २७ वर्षांनी बेजोस हे पद सोडत आहेत. अॅमेझॉनचे सध्याचे मूल्य १४ लाख कोटी आहे. बेजोस कंपनीचे कार्यकारी प्रमुख कायम राहतील. ते डे-१ फंड आणि बेजोस अर्थ फंडसारख्या कल्याणकारी योजना व अवकाश संशोधनासह इतर उपक्रमांवर लक्ष ठेवतील.
कर्मचाऱ्यांना केला ई-मेल : बेजोस यांनी आपल्या १३ लाख कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे की, माझा प्रवास २७ वर्षांपूर्वी सुरू झाला होता. तेव्हा अॅमेझॉन हा फक्त एक विचार होता. त्याची ओळख नव्हती. आज आम्ही १३ लाख प्रतिभावान, समर्पित लोकांना रोजगार देत अाहोत. हे कसे शक्य झाले? केवळ नव्या शोधांमुळे. आपण एकामागे एक धाडसी पावले उचलली. कस्टमर रिव्ह्यू, पर्सनलाइझ्ड रिकमंडेशन्सना प्राधान्य दिले. तुम्ही मन लावून काम करता तेव्हा आश्चर्यकारक शोधांनंतर काही वर्षांनी त्या गोष्टी सामान्य होऊन जातात. लोक अगदी सहजपणे ही कामे करू लागतात. यामुळेच संशोधकांना पूर्ण समाधान मिळते. सोनेरी दिवस होते तेव्हा तुम्ही विनम्र राहिलात. आव्हाने समोर होती तेव्हा खंबीर व सोबत राहिलात.
अॅमेझॉनच्या या दीर्घ प्रवासात जगाला आश्चर्य वाटेल, अशा अनेक गोष्टी आहेत. तुम्ही शोध लावत राहा. तुमच्या कल्पना पाहून कुणी मूर्खात काढले तरी निराश होऊ नका. संधी शोधत राहा, जिज्ञासू वृत्तीला दिशा द्या. तोच तुमचा पहिला दिवस असेल.
अॅमेझॉनची जबाबदारी खांद्यावर घेण्यास सज्ज अँडी जेसी हे बेजोस यांचा उजवा हात मानले जातात. ५३ वर्षीय अँडी यांनी २००३ मध्ये अमेझॉन वेब सेवा (एडब्ल्यूएस) लाँच केली होती. जेसी या मीटिंगला द चॉप म्हणत. कर्मचाऱ्यांनुसार, द चॉपमध्ये महत्त्वाची चर्चा होत असे. काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदावनती याच बैठकीत केली जाई. द चॉपमध्ये जायचे तर पूर्ण तयारीनिशी जावे लागे. अन्यथा अँड म्हणजे असा शार्क आहे जो १०० मैलांवरून केवळ रक्ताच्या एका थेंबाच्या गंधावरून लक्ष्य शोधतो, तसे अँडी कमतरता ओळखत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.