आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिनपिंग यांची हुकूमशाही:चीनमध्ये आता इतिहासावर चर्चा केल्यास तुरुंगाची हवा! चीनमध्ये 10 अफवांची यादी जाहीर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये एका २७ वर्षीय महिलेस महापुरुषाच्या विरोधातील वादग्रस्त वक्तव्याच्या प्रकरणात सात महिन्यांची कैद ठोठावण्यात आली आहे. जु नावाच्या या महिलेने कम्युनिस्ट पार्टीचे नेते डाँग चुनरुई यांची खिल्ली उडवली होती. चीनच्या शालेय अभ्यासक्रमात चुनरुई यांना युद्ध नायकाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्या योगदानामुळे १९४९ मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी सत्तेवर येऊ शकली. चीनमध्ये शहीद व जननायक अशी प्रतिमा असलेल्या नेत्यांची बदनामी केल्या प्रकरणात गुन्हा ठरवणारा एक नवा कायदा लागू झाला आहे. त्याचे उल्लंघन केल्याचा ठपका या महिलेवर ठेवण्यात आला आहे. मार्चमध्ये कायद्यातील दुरुस्तीत याबद्दलची तरतूद करण्यात आली होती. हा कायदा राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या मोहिमेचा एक भाग आहे. त्याचा उद्देश कम्युनिस्ट पार्टीचा इतिहास व त्याच्या नेत्यांवरील ऐतिहासिक चर्चांना पूर्णविराम देणे असा आहे.

चीनच्या सायबरस्पेस प्रशासनाने नागरिकांना कम्युनिस्ट पार्टीच्या महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी ऑनलाइन हॉटलाइन देखील उपलब्ध करून दिली आहे. त्याचबरोबर १० प्रकारच्या अफवांची यादी देखील तयार करण्यात आली आहे. यादीतील विषयांवर चर्चा करण्यास मनाई करण्यात आली आहे. माआेत्से तुंग यांचे आंदोलन वास्तविक एवढे दीर्घकालीन होते का? माआे यांचा पुत्र माआे एनिंग, कोरिया युद्धादरम्यान अमेरिकन हवाई हल्ल्यात ठार झाला होता? त्याने भात करण्यासाठी स्टोव्ह जाळला होता? अशा स्वरूपाचे प्रश्न विचारता येणार नाहीत. बीजिंगमधील राजकीय विश्लेषक वू कियांग म्हणाले, याद्वारे राजकीय हुकूमशाहीची सुरुवात झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत. त्याची स्थापना होईल, असे दिसते.

आधी संशोधन केल्या जाणाऱ्या विषयातही आता शिक्षा
चीनची कम्युनिस्ट पार्टी दीर्घ काळापासून असंतोषाचे दमन करत आहे. तिबेटपासून तियानमेन स्क्वेयरपर्यंत विरोधी चर्चेला बंदी घालण्यात आली आहे. हा नवा कायदा पुढे जाऊ शकेल. कम्युनिस्ट पार्टीचा इतिहास व त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या विषयांवर चर्चा करण्याची कृती आता गुन्ह्याच्या कक्षेत समाविष्ट होणार आहे. खरे तर एकेकाळी हे विषय संशोधनाचे होते. त्यात माआे शासनकाळाचाही समावेश होता. परंतु मार्चपासून आतापर्यंत या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १५ जणांना शिक्षा भोगावी लागली आहे. वास्तविक हे अतिशय किरकोळ स्वरूपाचे मुद्दे होते.

बातम्या आणखी आहेत...