आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही चांगले संकेत:नोकऱ्यांत वाढ आणि पगारदेखील चांगले

लिडिया डिपिलिस2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत मंदीच्या संकेतांदरम्यान नोव्हेंबरमध्ये कामगारांची मागणी कायम राहिली. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्याने बेरोजगारी वाढण्याची अपेक्षा आहे. तरीसुद्धा तंत्रज्ञान उद्योगातील कपातीदरम्यान २,६३,००० लोकांना इतर नोकऱ्या मिळाल्या आहेत. ऑक्टोबरमधील २ लाख ८४,००० च्या तुलनेत ही संख्या थोडी कमी आहे. बेरोजगारीचा दर ३.७ टक्के आहे, तर वेतन गेल्या वर्षीच्या तुलनेत ५.१ टक्क्यांनी जास्त आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा जास्त आहे. नोकऱ्यांच्या वाढीव मागणीमुळे कामगारांना फायदा होईल, तर व्याजदर वाढवण्याचा फेडरल रिझर्व्हचा हेतू बळकट होऊ शकतो. यामुळे २०२३ मध्ये मंदी येऊ शकते. रोजगारात सातत्याने वाढ होत असतानाही चढ्या व्याजदराचा परिणाम दिसू लागला आहे. उत्पादन आणि गृहनिर्माण यांसारख्या उत्पादक क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्या कमी झाल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...