आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ४५ लाखांहून जास्त जणांनी नोकरीचा राजीनामा दिला. ऑक्टोबरच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. कारण आधीच्या महिन्यात सुमारे ४२ लाख लोकांनी नोकरी सोडली होती. अमेरिकेच्या रोजगार विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन दशकांत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने नोकरी सोडल्याची नोंद झाली आहे.
लोक आता चांगली संधी मिळवू लागले आहेत. त्यामुळे ते सध्या करत असलेली नोकरी सोडू लागल्याचे दिसून आले. गेल्या दोन वर्षांपासून काेराेना महामारीमुळे आर्थिक व्यवहार व अर्थव्यवस्थेची वाटचाल दबावाखाली सुरू आहे. नियोक्त्यांनाही विचित्र आणि विराेधाभासी परिस्थितीला तोंड देण्याची वेळ आली आहे. अमेरिकेत नोकरी सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा स्थितीला आता तेथे ‘ग्रेट रेझिग्नेशन’ असे संबोधले जात आहे. वास्तविक कोरोनामुळे श्रमजीवींना स्वत:चा आणि कुटुंबाचा प्राधान्यक्रम ठरवून वाटचाल करणे अनिवार्य झाले आहे.
परंतु बहुतांश रोजगाराच्या संधी हॉस्पिटॅलिटी व इतर कमी वेतन देणाऱ्या क्षेत्रात उपलब्ध आहेत. या क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी मोठी स्पर्धा दिसून येते. इंडिड लॅबच्या आर्थिक विभागाचे प्रमुख नील बंकर म्हणाले, हे ‘ग्रेट रेझिग्नेशन’ कमी वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे. हा समुदाय मोठी संधी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांना संधी मिळाली आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या सगळ्या गदारोळात काही श्रमिकांना चांगले वेतन व कामाची मागणी करण्याची संधीदेखील मिळू लागली आहे.
परंतु नोकरी सहजपणे बदलू न शकणाऱ्या कामगारांना वेतनात अपेक्षित अशी वाढ व लाभ पुरेशा प्रमाणात मिळालेले नाहीत. नोकरीत राहणाऱ्यांच्या तुलनेत नोकरी बदलणाऱ्यांना जास्त वेतन मिळू लागले आहे, असे फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ अटलांटाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत नोव्हेंबरमध्ये २.१० लाखावर नवा रोजगार निर्माण केला. गेल्या तत्पूर्वीच्या महिन्याच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. परंतु अर्थव्यवस्थेची वाटचाल योग्य मार्गाने होत असल्याचा दावा अहवालातून करण्यात आला आहे. कामगारांची मागणी व वेतनवाढीनंतरही नागरिक अर्थव्यवस्थेबाबत निराशावादी दिसून येतात.
मोमेंटिव्हच्या एका पाहणीनुसार केवळ २१ जण म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत आर्थिक स्थिती चांगली आहे. ग्राहकांचा आत्मविश्वास पाहता गेल्या पाच वर्षांत ते सर्वाधिक घसरल्याचे दिसून आले आहे. बायडेन यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून रिपब्लिकन अर्थव्यवस्थेच्या बाबतीत निराशावादी दिसून आले होते. परंतु अलीकडच्या काही महिन्यांत तर डेमॉक्रॅटिकचे समर्थकदेखील जास्त निराश दिसले. दहापैकी नऊ जण म्हणाले, काही बाबतीत चिंता वाटत होती. सहा जणांना जास्त चिंता वाटत होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.