आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारोबोट आमच्यात सुमारे सहा दशकांपासून आहे. मुळात ते यांत्रिक मशीनच राहिले आहेत. जसे निर्देश दिले तसे तो काम करतो. तथापि, आता परिस्थिती बदलली आहे. मनुष्य आणि रोबोट यांच्यातील नाते बहरत आहे. अमेरिकेतील रोबोटिक तज्ज्ञ पॅनलच्या मते यामागील दोन कारणे आहेत. पहिले कोविड-१९ मुळे अनेक सामाजिक बदल घडले. जगात लाखो लोकांना नोकरी सोडावी लागली. घरून काम करण्याची नवी संधी मिळाली. नोकऱ्या गेल्याने कोठारे रिकामी झाली. अनेक व्यवसाय मजुराच्या टंचाईचा सामना करत आहेत. पुरवठा साखळी विस्कळीत झाली तर ई-कॉमर्समध्ये तेजी आली. दुसरीकडे रोबोट गतीने चांगले होत आहेत.
वस्तू उचलण्याऐवजी ते होम डिलिव्हरीसाठी वस्तू पॅक करत आहेत. अॅडव्हान्स्ड सेन्सॉर आणि शीन लर्निंगने सज्ज आहेत. असे रोबोट हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेत मदत करत आहेत. वृद्धांचा सांभाळ करत आहेत. विशेषत: कोरोनानंतर टेलीमेडिसिनमध्ये रोबोटचे महत्त्व वाढले आहे. तथापि, इंडस्ट्रीत पूर्णपणे रोबोटचा वापर अशक्य आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कार प्लँट गतीने अत्याधुनिक झाले आहेत. परंतु सर्वात अॅडव्हान्स प्लँटमध्येही १० कामगारांच्या जागी एक रोबोट काम करत आहे.
अमेरिकेत रोबोट विक्री, उत्पादनांमध्ये नोकऱ्या
जगभरात रोबोटशी निगडित इंडस्ट्रीची जागतिक संस्था इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्सच्या मते, पृथ्वीवर ३० लाखांहून अधिक इंडस्ट्रियल रोबोट आहेत. लाखो अन्य रोबोट कोठारांत सामान उचलतात, घर स्वच्छ ठेवतात, लॉनची स्वच्छता करतात आणि शस्त्रक्रियेत सर्जनची मदत करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.