Biden Appointed People Of Indian Origin; Punit Renjen & Rajesh Subramaniam | Us Export Council | Joe Biden
बायडेन यांनी भारतीय वंशाच्या दोघांची केली नियुक्ती:पुनीत रंजन आणि राजेश सुब्रमण्यम निर्यात परिषदेत सामील, दोघेही व्यापार तज्ज्ञ
वॉशिंग्टन23 दिवसांपूर्वी
कॉपी लिंक
डावीकडून पुनीत रंजन आणि उजवीकडे राजेश सुब्रमण्यम (फाइल फोटो)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या निर्यात परिषदेवर भारतीय वंशाच्या दोन व्यापार तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. पुनीत रंजन आणि राजेश सुब्रमण्यम अशी नियुक्त केलेल्या व्यापार तज्ज्ञांची नावे आहेत. दरम्यान, या दोघांची नियुक्ती अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. कारण एक्सपोर्ट परिषद ही आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण हाताळणारी सर्वात मोठी संस्था आहे. पुनीत रंजन आणि राजेश सुब्रमण्यम यांच्या नामांकनाची घोषणा व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली. यापूर्वी बायडेन यांनी भारतीय वंशाचे अजय बंगा यांची वर्ल्ड बॅंकेच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती.
एक्सपोर्ट काऊन्सिल नेमके काय करते एक्स्पोर्ट कॉऊन्सिलमध्ये फक्त व्यापार तज्ज्ञांचा समावेश केला जातो. हे लोक सरकारसाठी व्यापार धोरणे बनवतात. ते किती प्रभावी ठरतील यावर देखील लक्ष्य ठेवतात. याशिवाय ते वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रांमध्ये आणि देशांना व्यापार वाढीसाठी अमेरिकन व्यापाराला भेडसावणाऱ्या समस्यांवर उपायही मार्गदर्शन करतात. सहसा ही परिषद व्यवसाय, उद्योग, शेती कामगार आणि सरकारी क्षेत्राशी संबंधित आहे.
गतवर्षी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबतचा हा फोटो असून पुनीत रंजन यांनी रिट्विट केला होता.
पुनीत रंजन आणि राजेश सुब्रमण्यम कोण आहेत
राजेश सुब्रमण्यम सद्यस्थितीत FedEx चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष म्हणून काम करतात. कंपनीच्या संचालक मंडळावर देखील काम करतात. FedEx ही जगातील सर्वात मोठी वाहतूक कंपनी आहे. राजेश हे FedEx च्या संपूर्ण बिझनेस स्ट्रॅटेजीचे नेतृत्व करतात. यासाठी एक समिती असून त्यात एकूण पाच सदस्यांचा समावेश आहे. राजेश यांनी यापूर्वी प्रॉक्टर अँड गॅम्बल, यूएस चेंबर ऑफ कॉमर्स आणि चीनच्या सल्लागार मंडळावर देखील काम केले आहे.
त्यांना भारताच्या कारभाराविषयी देखील इंत्यभूत माहिती आहे. त्याचे कारण म्हणजे ते यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये आहे. याशिवाय त्यांनी अमेरिका-चीन बिझनेन काऊन्सिलचे नेतृत्व केले आहे. त्यांना यंदाचा प्रवासी भारतीय सन्मानही मिळाला आहे.
पुनीत रंजन यांच्याबद्दल सांगायचे झाले तर ते 31 डिसेंबर 2022 रोजी डेलॉइट ग्लोबलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून निवृत्त झाले. जून 2015 पासून ते या कंपनीचे प्रमुख होते. ही कंपनी 150 देशांमध्ये कार्यरत आहे. त्यात सुमारे 4 लाख 15 हजार कर्मचारी काम करतात. 2022 मध्ये, Deloitte ने सुमारे 60 अब्ज डॉलरची कमाई केली.
अजय बंगा यांना वर्ल्ड बॅंकेची कमान मिळेल
मास्टरकार्डचे माजी सीईओ अजय बंगा हे वर्ल्ड बॅंकेचे नवे अध्यक्ष होऊ शकतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी गुरूवारी त्यांची नियुक्ती केली. यासाठी नामांकन मिळालेले ते भारतीय वंशाचे पहिले व्यक्ती आहेत. जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी एप्रिल 2024 पूर्वी ते पद सोडणार असल्याची घोषणा केल्यानंतर त्यांचे नामांकन करण्यात आले आहे. सध्या, 63 वर्षीय भारतीय-अमेरिकन बंगा हे प्राइवेट इक्विटी फंड जनरल अटलांटिक कंपनीचे उपाध्यक्ष आहेत.
अजय बंगा हे त्या भारतीय-अमेरिकन पिढीचे आहेत. ज्यांनी भारतात शिक्षण घेतले आणि अमेरिकेत आपली क्षमता सिद्ध केली. त्यांचे जीवन म्हणजे कठोर परिश्रम, संघर्ष आणि यशाची गाथा आहे. त्यांचे शालेय शिक्षण जालंधर आणि शिमला येथे झाले. डीयूमधून पदवी आणि IIM अहमदाबादमधून एमबीए केले. 1981 मध्ये ते नेस्ले इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाले आणि 13 वर्षांत मॅनेजर बनले.
त्यानंतर ते पेप्सिकोच्या रेस्टॉरंट विभागाचे भाग बनले. त्यावेळी उदारीकरणाचा काळ होता. जेव्हा बंगा यांनी भारतात पिझ्झा हट आणि केएफसीच्या लॉन्चिंगमध्ये प्रमुख भूमिका बजावली होती.
बंग 1996 मध्ये सिटीग्रुपचे मार्केटिंग हेड बनले. 2000 मध्ये सिटी फायनान्शियलचे प्रमुख म्हणून नियुक्ती. 2009 मध्ये मास्टरकार्डचे सीईओ बनले आणि त्यांच्या मार्केटिंग धोरणामुळे मास्टरकार्ड तरुणांत इतके लोकप्रिय झाले की ते एक स्टेट्स सिम्बॉल बनले. बंगा यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
2012 मध्ये प्रसिद्ध मासिक फॉर्च्युनने बंगा यांची 'पॉवरफुल इंडस्ट्रियालिस्ट-2012' म्हणून निवड केली. हिंदुस्थान युनिलिव्हरचे माजी अध्यक्ष मनविंदर सिंग बंगा यांचे ते भाऊ आहेत.