आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जाे बायडेन यांची राष्ट्राध्यक्षपदी तर भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या उपराष्ट्राध्यक्षपदावरील निवडीवर अमेरिकेच्या इलेक्टोरल कॉलेजने शिक्कामोर्तब केले आहे. याबरोबरच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कायदेशीर लढाईस विराम लागला आहे. त्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा आरोप केला होता.
इलेक्टोरल कॉलेजची बैठक डिसेंबरमधील दुसऱ्या बुधवारनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी होत असते. याच दिवशी सर्व ५० राज्ये व डिस्ट्रिक्ट कोलंबियाचे प्रतिनिधी मतदान करण्यासाठी बैठक घेतात. इलेक्टोरल कॉलेजच्या घोषणेनंतर बायडेन म्हणाले, अमेरिकेच्या लोकशाहीची परीक्षा घेतली गेली आणि यामुळे ती धोक्यात टाकण्यात आली. मात्र, देशाची लोकशाही खरी आणि दृढ असल्याचे सिद्ध झाले.
अमेरिकेच्या आत्म्यासाठी झालेल्या लढाईत लोकशाहीचा विजय झाला. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. आता एकत्र येण्याची, जखमा भरण्याची वेळ आली आहे. बायडेन यांनी ५३८ सदस्यांच्या इलेक्टोरल कॉलेजची ३०६ मते मिळवली. जी आवश्यक २७० मतांपेक्षा जास्त आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.