आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Joe Biden Hatbal Next To 'Trump Card'; Search For A New Face For 2024, Decrease In Rating News In Marathi

रेटिंगमध्ये घसरण:‘ट्रम्प कार्ड’पुढे जो बायडेन हतबल; 2024 साठी नव्या चेहऱ्याचा शोध

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या मध्यावधी निवडणुकीपूर्वी उमेदवारांच्या निवडीसाठी रिपब्लिकन व डेमोक्रॅटिकमध्ये प्रायमरी सुरू आहे. म्हणजेच दोन्ही पक्षांतर्गत अध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड प्रक्रिया सुरू झाली. रिपब्लिकन पार्टीचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा झंझावाती प्रचार आणि अनेक मुद्द्यांवर ट्रम्प यांनी खेळलेल्या डावपेचापुढे जो बायडेन हतबल दिसून येत आहेत. डेमोक्रॅटिकचे ५० हून जास्त सिनेटर्स व कौटी नेत्यांशी चर्चेनुसार बायडेन यांना दुसऱ्या टर्मसाठी पक्षातील नेतेमंडळी उत्सुक नाहीत. पक्षात तशी स्वीकारार्हता दिसत नाही. डेमोक्रॅटिक पार्टीकडे ट्रम्प यांच्यासारखा झुंजार नेता नसल्याचे या नेत्यांना वाटते. त्याचबरोबर २०२४ च्या निवडणुकीसाठी पक्षाचा आत्मविश्वासदेखील डळमळीत होत चालल्याचे दिसते.

वयामुळे गोची, पुढील निवडणुकीत बायडेन ८२ वर्षांचे
पुढील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बायडेन ८२ वर्षांतील होतील. या वयात धावपळीबरोबरच ट्रम्पसारख्या नेत्याचा मुकाबला करणे त्यांच्यासाठी कठीण जाईल, असे बायडेन विराेधकांना वाटते. तसे तर बायडेन यांनी उमेदवारीबाबत आशावादी विधाने केली.

बायडेन यांच्यासमाेर 4 आव्हाने

महागाई गेल्या चार दशकांत सर्वाधिक इंधन, अन्नधान्याचे दर आकाशाला भिडले.

कोरोनाने अर्थव्यवस्था डळमळीत विकास दरात १.५ टक्क्याने घट

सार्वजनिक ठिकाणी गोळीबार सुरूच सर्व राज्ये नियंत्रण मानण्यास तयार नाहीत

गर्भपात कायदा रद्द झाल्यास नाराजी लॅटिन-कृष्णवर्णीय नाराजी वाढणार

नवा चेहरा : जेस्मिन टेक्सासच्या प्रतिनिधी जेस्मिन क्रॉकेट (४१) कृष्णवर्णीय चेहरा बायडेन यांना आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यांचा तरूणांना पाठिंबा आहे. तरुणांच्या मदतीनेच ट्रम्प यांना टक्कर देता येईल, असे त्यांना वाटते.

कमला यांच्याविरोधात दिग्गज नेते
उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस या बायडेन यांच्या उत्तराधिकारी असल्याचे काही जाणकारांना वाटते. परंतु परराष्ट्र दौऱ्यात कमला यांना कोविडबाबत सरकारची भूमिका प्रभावीपणे मांडता आलेली नाही, असा आरोप त्यांच्यावर होतो. कमला यांना सिनेटर एमी क्लोबुकर, वेरमाँट, सिनेटर बर्नी सँडर्स, एलिझाबेथ वॉरेन, कोरी बुकर, पीट गुटीगिग, बीटो यांनी विरोध केला आहे.

पक्षावर पकड : मर्फी
कनेक्टिकटचे सिनेटर क्रीस मर्फी यांनी डेमोक्रॅटिक पार्टीवर पकड मजबूत करण्यावर भर दिला आहे. गेल्या निवडणुकीत मर्फी यांनी आपली उमेदवारी दाखल केलेली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...