आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेला आज 46 वा राष्ट्राध्यक्ष मिळेल. डेमोक्रेट जोसेफ आर बायडेन ज्यूनियर म्हणजेच जो बायडेन (78) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतील. कार्यक्रम कॅपिटल हिल म्हणजेच अमेरिकेच्या संसदेत बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता (भारतीय वेळ रात्री 10.30 वाजता) होईल. बायडेन केवळ 35 शब्दांमध्ये शपथ घेतली. हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे भव्य असणार नाही. कोरोना व्हायरसमुळे जास्त गर्दी जमणार नाही. यावेळी केवळ एक हजार ते 1200 लोक शपथविधीमध्ये सहभाग घेऊ शकतील. सर्व पाहुण्यांसाठी कठोर हेल्थ प्रोटोकॉल असणार आहे.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधी कार्यक्रमात अमेरिकन लोकांकडून धोका असणाची ही पहिलीच वेळ आहे. 7 जानेवारी रोजी, इलेक्टोरल वोटच्या काउंटिंगदरम्यान कॅपिटल हिलच्या आत आणि बाहेर हिंसाचार झाला होता. त्यावेळी ट्रम्प समर्थकांनी अमेरिकन संसदेच्या आत घुसून तोडफोड केली. म्हणून अमेरिकेच्या सुरक्षा संस्था अधिक खबरदारी घेत आहेत.
शपथ कोण देईल?
विशेष पाहुणे कोण असतील?
डोनाल्ड ट्रम्प समारंभात सामील होणार नाहीत. त्यांची जागा व्हाइस प्रेसिडेंट माइक पेंस उपस्थित राहतील. यासोबतच माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश आणि बराक ओबामा हे देखील येत आहेत. वॉशिंग्टनमधील थिंकटँक ब्रूकिंग्ज इन्स्टिट्यूटचे फेलो एलेन कामार्क म्हणतात की पेंस यांचे येणे सर्वात महत्वाचे आहे. रिपब्लिकन पार्टी ट्रम्पपुरती मर्यादीत नाही हे पेंस यांना लोकांना पटवून सांगायचे आहे.
अत्यंत कडक सुरक्षा रिंग
80% इव्हेंट्स व्हर्जुअल
बायडेन यांनी डिसेंबरमध्ये म्हटले होते - यावेळी इनॉगरेशन डे (शपथग्रहण दिवस) काही वेगळा असेल. परेडसह जास्तीत जास्त इव्हेंट्स व्हर्चुअल होतील. राज्याच्या राजधान्यांमध्ये विविध सांस्कृतीक कार्यक्रम होतील. यामध्ये लोकल बँड्स परफॉर्म करतील. कोविड-19 शी लढा देणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सचेही स्मरण केले जाईल. डेमोक्रेट खासदार जेम्स क्लीबर्ग यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्ड (SMG) यांना म्हटले - 75% ते 80% इव्हेंट्स व्हर्जुअल होतील.
समारंभ समितीचे आवाहन - घरून कार्यक्रम पहा
प्रत्येक वेळी लाखो लोक या नाविन्यपूर्ण समारंभात सामील असतात. संयुक्त कॉंग्रेस समिती समारंभांसाठी तिकिटांचे वितरण करीत आहे, परंतु ही तिकिटे केवळ कॉंग्रेसच्या सदस्यांसाठी आणि पक्षाच्या अन्य सदस्यांसाठी आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्यांना यावेळी तिकिट मिळत नाही. लोकांना घरातून व्हर्च्युअल कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे. अध्यक्षीय एकत्रीकरण समिती सर्व कार्यक्रम थेट आयोजित करेल.
प्रत्येक खासदारासोबत फक्त एक गेस्ट
यापूर्वी अमेरिकी संसदेच्या (सिनेट आणि हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स) दोन्ही सभागृहातील खासदारांना एकूण 2 लाख तिकिटे किंवा पास देण्यात येत होते. ते त्यांना आपल्या मतदारसंघातील लोकांमध्ये विभागून देत असत. यावेळी प्रत्येक खासदाराला फक्त 2 तिकिटे मिळतील. म्हणजेच, प्रत्येक खासदार (एकूण 538) सह एकच अतिथी येऊ शकतो.
40 वर्षांपासून वाढत गेली भाषणांची वेळ
1940 ते 1980 च्या काळात जवळपास 1,612 शब्दांचा उपयोग झाला. 1980 ते 2013 च्या काळात हे वाढून 2,120 शब्द झाले. 2013 मध्ये ओबामा यांचे भाषण 20 मिनिटांचेच होते. या दरम्यान ते दोन हजार शब्द बोलले होते.
सर्वात मोठे भाषण : विलियम हेनरी हॅरिसन यांचे 1841 चे भाषण हे 1 तास 45 मिनिटांचे होते. यामध्ये ते 8445 शब्द बोलले. भीषण थंडीमध्ये हॅट आणि कोट न घालत्याने हॅरिसन यांना नंतर निमोनिया झाला होता आणि राष्ट्राध्यक्ष बनल्याच्या एक महिन्यानंतर त्यांचे निधन झाले.
सर्वात छोटे भाषण : पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंगटन यांचे भाषण. 1973 च्या या भाषणामध्ये केवळ 135 शब्दांचा वापर झाला.
टीव्हीवर पाहिलेले पहिले भाषण : 1949 मध्ये हॅरी एस. ट्रूमैन यांचे भाषण टीव्हीवर प्रसारित होणारे असे पहिले भाषण होते. त्यावेळी अमेरिकेच्या घरांमध्ये केवळ 44 हजार टीव्ही सेट उपलब्ध होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.