आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या इतिहासातील नवीन अध्याय:युनिटीच्या आश्वासनासह अमेरिकेचे सर्वात वयस्कर राष्ट्रपती बनले बायडेन, कमला पहिल्या महिल्या उपराष्ट्रपती

वॉशिंग्टनहून दिव्य मराठीसाठी रोहित शर्मा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऐतिहासिक संकट व आव्हाने समोर आहेत, पण अमेरिकी एकात्मता हा मार्ग सुकर करेल : बायडेन

हिंसाचाराच्या भीतीच्या छायेत बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा शपथविधी अत्यंत शांततेत पार पडला. पाच इंच बायबलवर हात ठेवून ३५ शब्दांत शपथ घेतल्यानंतर अध्यक्ष बायडेन यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. ते म्हणाले, हा लोकशाहीचा दिवस आहे, इतिहास आणि आशेचा दिवस, नवसंकल्पांचा दिवस आहे. दरवेळी नवी परीक्षा होत असते. प्रत्येक वेळी अमेरिका त्यातून सावरते. आज आपण विजयाचा आनंदोत्सव साजरा करावा, परंतु हा एका उमेदवाराचा नव्हे, लोकशाहीचा विजय आहे. नागरिकहो, ही परीक्षेची वेळ आहे. आपल्या लोकशाहीवर हल्ला झाला. कोरोना, वंशवाद ही संकटे आली. मात्र, आपण एकजुटीने सामना केला. आता ऐतिहासिक संकट आणि आव्हाने समोर आहेत. परंतु, अमेरिकी एकात्मता हा मार्ग सुकर करेल. ही जबाबदारी पार पाडत आपण आपल्या मुलांना नवे, समृद्ध जग दाखवू. असेच घडेल, हा मला विश्वास आहे. असभ्य युद्धाचा अंत व्हावा. काही दिवसांपूर्वी याच जागी हिंसाचार झाला. त्यानंतर आपल्याला कळून चुकले की लोकशाहीच बहुमोल आहे. त्याचे आपण रक्षण करू. हा देश सर्वांचा आहे, सर्वांचाच राहील.

कमला या तर परिवर्तनाचे उदाहरण

बायडेन म्हणाले, ‘तुम्ही मला मते दिली नसली तरी ऐका. माझे मन आजमावा. तरीही मतभेद वाटले तर जाणा की हीच लोकशाही आहे. जगासमोर आपण आपल्या शक्तीचे उदाहरण नव्हे, उदाहरणाची शक्ती दाखवायची आहे. परिवर्तनाचे एक ताजे उदाहरण म्हणजे उपाध्यक्षा कमला हॅरिस आहेत. श्वेतवर्णाच्या श्रेष्ठतेसारख्या आखूड विचारांना आता अमेरिकेत कोणतेही स्थान उरलेले नाही.’

> बायडेन यांचे हे भाषण तेलंगणातून अमेरिकेत स्थायिक विनय रेड्‌डी यांनी लिहिले आहे.

बायडेन सरकारमध्ये हे सगळे प्रथमच

वांशिक विचार करता बायडेन यांचे मंत्रिमंडळ सर्वात वेगळे असेल. या नव्या सहकाऱ्यांमध्ये अनेकांचा “प्रथमच’ योग... उदा.

> कमला हॅरिस: पहिल्या कृष्णवर्णीय महिला... पहिल्या आशियाई उपाध्यक्षा

> डेब हॉलंड: पहिल्या नेटिव्ह अमेरिकी कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून नियुक्त होणार.

> जेनेट येलेन: अमेरिकेतील पहिली महिला कोषागार प्रमुख होणार.

> लॉयड ऑस्टिन : पहिले कृष्णवर्णीय संरक्षणमंत्री होणार.

> अलेझांद्रो मेयरकास : अंतर्गत सुरक्षा सांभाळणारे पहिले निर्वासित.

> पीट बटिगिग: कॅबिनेटमध्ये सहभागी होणारे पहिले समलैंगिक. ट्रान्सपोर्ट सेक्रेटरीचे पद.

> एव्हरिल हेन्स: राष्ट्रीय गुप्तचर विभागाची पहिली महिला महासंचालक.

> नीरा टंडन: ऑफिस ऑफ मॅनेजमेंट सांभाळणारी पहिली कृष्णवर्णीय.

> वनिता गुप्ता: न्याय विभाग सांभाळणारी पहिली कृष्णवर्णीय.

> झेवियर बेकेरा: हेल्थ अँड ह्यूमन सेवेत पहिले लॅटिन अमेरिकी सदस्य.

बायडेन यांच्या नाॅमिनीत निम्म्या महिला, निम्मे कृष्णवर्णीय

पाच महिलाही प्रथमच...

बायडेन मंत्रिंडळात प्रथमच ५ महिला असतील. सर्वात प्रथम १९३३ मध्ये रुझवेल्ट मंत्रिमंडळात महिला सहभागी होत्या. १९९३ मध्ये क्लिंटन कॅबिनेटमध्ये प्रथमच ३ महिला मंत्री होत्या. ओबामांच्या कार्यकाळात ही संख्या ४ झाली. ट्रम्प यांच्या काळात दोन महिला होत्या.

जाता जाता ट्रम्प म्हणाले, आम्ही नव्या रूपात येऊ

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी व्हाइट हाऊस सोडले. शपथविधी सोहळ्यात उपस्थित न राहणारे १८६९ नंतर ते पहिले राष्टाध्यक्ष ठरले. त्यांनी व्हिडिओतून निरोपाचे भाषण केले. ते म्हणाले, मी तुम्हाला गुडबाय करू इच्छितो, परंतु अधिक काळ दूर राहणार नाही. दुसऱ्या एखाद्या रूपात मी परतेन. कार्यकाळात कोणतेही युद्ध न झालेला मी अमेरिकेचा पहिला अध्यक्ष ठरलो आहे.

बातम्या आणखी आहेत...