आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीयांना शुभेच्छा:ट्रम्प आणि मेलानियासह बायडेन यांनी भारतीयांना दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा, कमला म्हणाल्या - नवीन वर्षाच्या शुभेच्छा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन आणि व्हाइस प्रेसिडेंट इलेक्ट कमला हॅरिस यांनीही भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया यांनी भारतीय बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्यासह प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन आणि व्हाइस प्रेसिडेंट इलेक्ट कमला हॅरिस यांनीही भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस म्हणाल्या की - नव वर्षाच्या शुभेच्छा.

ट्रम्प काय म्हणाले
व्हाइट हाउसमधून दिवाळीच्या निमित्ताने एक वक्तव्य जारी करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले - फर्स्ट लेडी आणि मी तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. दिव्याच्या या उत्सवात तुम्ही मित्र, शेजारी आणि आपल्या लोकांसोबत राहा आणि वाईटावर चांगल्याचा विजय या रुपात उत्सव साजरा करा. अंधारावर प्रकाश, अज्ञानावर ज्ञानाचा विजय व्हावा. घरात दिवे पेटतील. मग ते घर असो, ऑफिस असो किंवा धार्मिक स्थळे. हा सण आपल्याला आशा आणि समर्पणाचा पारंपारिक संदेश देतो. हे आपल्या जीवनात आणते.

ट्रम्प पुढे म्हणाले - 'अमेरिका आस्थेवर विश्वास ठेवणारा देश आहे. मला गर्व आहे की, माझ्या सरकारने नागरिकांना सांविधानिक अधिकार आणि त्याच्या आस्थेचे रक्षण केले आहे. अमेरिकेतील लोक जेथेही दिव्यांचा प्रकाश करतील, हा आपल्या स्वातंत्र्याचा प्रकाश असेल. जगभरात जेथेही दिवाळी साजरी केली जात आहे, आम्ही त्या सर्व लोकांना पुन्हा एकदा या पर्वाच्या शुभेच्छा देतो. '

बायडेन यांनी दिल्या शुभेच्छा
20 जानेवारी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेत असणारे आणि सध्या प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन म्हणाले - 'लाखो हिंदू, जैन, शिख आणि बौद्धांना प्रकाशच्या पर्वाच्या शुभेच्छा. मी आणि जिल बायडेन तुम्हाला या पर्वाच्या शुभेच्छा देतो. आशा आहे की, येणारे वर्ष तुमच्या आशा, आनंद आणि समृद्धी वाढवेल. या वर्षाच्या शुभेच्छा. बायडेन 20 नोव्हेंबरला 78 वर्षांचे होणार आहेत. ते अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष असतील.'

कमला हॅरिस काय म्हणाल्या?
अमेरिकेच्या इतिहासातील पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनत असलेल्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनीही भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी यासाठी ट्विट केले. हॅरिस म्हणाल्या - हॅप्पी दिवाळी आणि या वर्षाच्या शुभेच्छा. डगलस (पती) आणि मी आशा करतो की, जगातील प्रत्येक भागात तुम्ही सुरक्षित, निरोगी आणि आनंदाने दिवाळी साजरी करत असाल.

कमला यांनी गेल्या आठवड्यात निवडणुका जिंकल्यानंतर भारतातील आठवणींना उजाळा दिला होता. हॅरिस यांच्या आई भारतातील होत्या. व्हाइस प्रेसिडेंट इलेक्टर अनेक भाषणांमध्ये त्यांच्या आठवणींना उजाळा देतात.

बातम्या आणखी आहेत...