आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प लोकशाहीसाठी धोकादायक:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले - ट्रम्प हे लोकशाहीचे शत्रू, लोकांचे हक्क हिरावून घेणारे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत 8 नोव्हेंबरला मध्यावधी निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमुळे अमेरिकन सिनेटमध्ये कोणत्या पक्षाचे वर्चस्व स्थापित होईल, हे समजणार आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा रिपब्लिकन पक्ष आणि दुसरा बायडेन यांचा डेमोक्रेटिक पक्ष असे दोन पक्ष आहेत. मध्यावधी निवडणुकीपूर्वी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ट्रम्प आणि त्यांचा रिपब्लिकन पक्ष देशासाठी धोका असल्याचा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले की, ट्रम्प आणि त्यांचे समर्थक अमेरिकन लोकशाहीचे शत्रू आहेत. त्यांच्या सत्तेखाली देशात लोकशाहीची शाश्वती नाही. त्यांना देश मागे न्यायचा आहे. जिथे लोकांना गोपनीयतेचा व इतर कोणतेही अधिकार नसतील अशी अमेरिका बनवायची आहे.

समानतेवर हल्ला
फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया येथे एका भाषणादरम्यान, जो बायडेन म्हणाले की, अमेरिकेन हे लोकशाहीची हमी आहेत, हे आपण बऱ्याच काळापासून स्वतःला पटवून दिले आहे. पण, आता तसे नसल्याचे दिसून येत आहे. समता आणि लोकशाहीवर हल्ला होत आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला आवाज उठवावा लागेल. यावेळी त्यांनी 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' विचारसरणीचे समर्थन करणाऱ्यांचाही निषेध केला.

राजकीय हिंसाचाराचा निषेध

अमेरिकेत राजकीय हिंसाचाराला जागा नाही, असे बायडेन म्हणाले. त्याचा इशारा हा गेल्या वर्षी झालेल्या कॅपिटल हिंसाचाराकडे होता. अमेरिकेत 6 जानेवारी 2021 रोजी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल हिल (यूएस संसद) वर हल्ला केला. ट्रम्प यांच्या पराभवामुळे ते संतप्त झाले होते. राष्ट्रपती निवडणुकीचे निकाल उलथवण्याचा हा प्रयत्न मानला जात होता.

बायडेन पिछाडीवर
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या प्राथमिक निवडणुका मे महिन्यात झाल्या होत्या. या निवडणुकीत दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार लोकांमध्ये जातात आणि लोकप्रियतेच्या जोरावर स्वतःच्या पक्षात उमेदवारी मिळवतात. या सर्वेक्षणात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा डेमोक्रॅटिक पक्ष हा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षापेक्षा मागे आहे.

सर्वेक्षणात विविध मुद्द्यांवर डेमोक्रॅटिक पक्षाला 44% लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. तर रिपब्लिकन पक्षाला 47% लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाप्रती लोकांची सर्वात मोठी नाराजी ही वाढती महागाई आहे. वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यात रिपब्लिकन पक्ष अधिक चांगला सिद्ध होईल, असे 41% लोकांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...