आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Joe Biden Slams Donald Trump Coronavirus Response Assure Free Vaccine For All Americans; US Election 2020 | Latest News And Coverage Update

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेच्या निवडणुकीतही बिहारप्रमाणे आश्वासन:​​​​​​​डेमोक्रेट उमेदवार बायडेन म्हणाले - राष्ट्राध्यक्ष बनलो तर प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मोफत व्हॅक्सिन मिळेल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बिहार विधानसभा निवडणुकांचे भाजपचा जाहिरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्येही लसीचा मुद्दा होता.

अमेरिकेत 3 नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकांमध्ये कोरोना व्हायरस सर्वात मोठा मुद्दा बनत असल्याचे दिसत आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बचाव आणि स्वच्छतेच्या मुद्रेत आहेत. डेमोक्रेट कँडिडेट बायडेन यांनी शुक्रवारी म्हटले की - कोरोना नियंत्रित करण्याच्या प्रकरणात ट्रम्प अॅडमिनिस्ट्रेशन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जर मी राष्ट्राध्यक्ष झालो तर अमेरिकेत मोफत व्हॅक्सिन देण्यात येईल. मग त्याचा विमा असो किंवा नसो.

बिहार विधानसभा निवडणुकांचे भाजपचा जाहिरनामा नुकताच प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्येही लसीचा मुद्दा होता. यामध्ये म्हटले होते की, सत्तेत आलो तर बिहारमधील लोकांना मोफत व्हॅक्सिन देण्यात येईल.

बायडेन यांची टीका तिसर्‍या अध्यक्षीय चर्चेनंतर बायडेन डेलावेयरच्या विलमिंग्टन येथे दाखल झाले. इथल्या रॅली दरम्यान ते म्हणाले की, ट्रम्प म्हणतात की, त्यांनी कोरोनाविरूद्ध चांगला लढा दिला. परंतु, मी म्हणतो की या मुद्दयावर ते अयशस्वी झाले. जर हे यश असेल तर मग अपयश कसे असेल? प्रत्येक अमेरिकेन नागरिकाने याचा विचार केला पाहिजे. जेव्हा आम्हाला सुरक्षित आणि प्रभावी लस मिळेल. मी वचन देतो की ती प्रत्येक अमेरिकन नादकितासा विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाईल. मग तुम्ही विमा केलेला असो किंवा नको.

सरकार खरेदी करणार व्हॅक्सिन बायडेन याच रॅलीत पुढे म्हणाले की, मी विश्वास देतो की, व्हॅक्सिनची खरेदी पूर्णपणे फेडरल गव्हमेंट करेल. ज्यांना गरज आहे त्यांना अगोदर व्हॅक्सिन देण्यात येईल. बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर महामारीची खिल्ली उडवणे आणि हे गांभिर्याने न घेण्याचाही आरोप लावला. ते म्हणाले - आपल्या समोर मोठा धोका आहे. येणाऱ्या हिवाळ्यात व्हायरस जास्त धोकादायक ठरु शकतो. अमेरिकेने यासाठी तयार राहायला हवे.

खोटे बोलतात ट्रम्प आपल्या घरा जवळच्या रॅलीमध्ये बायडेन म्हणाले की - अमेरिकेत कोरोनामुळे 2 लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे ही गोष्ट कोण नाकारेल. राष्ट्राध्यक्ष अनेक महिन्यांपासून म्हणत आहेत की, कोरोना व्हायरस लवकरच संपणार आहे, आपण यावर नियंत्रण मिळवू. मात्र असे कधी होईल. मी त्यांना डिबेटमध्ये काल रात्रीच म्हटले होते की, अमेरिकन नागरिक कोरोनासोबत जगणे शिकेल नाही तरी मरणे अवश्य शिकतील. सरकार दोन लाख लोकांना मरण्यापासून वाचवू शकत होते. पण ते तसे करु शकले नाही. मी जर राष्ट्राध्यक्ष बनलो तर काँग्रेसला म्हणेल की, सर्वात पहिले कोरोनापासून सुटका करणारे बिल माझ्यासमोर असायला हवे. प्रत्येक राज्यात मास्क आवश्यक असेल.