आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जो बायडेन यांच्या भाषणांचे हिंदीत भाषांतर होणार:व्हाईट हाऊसने स्वीकारला भारतवंशीय अजय जैन यांचा सल्ला, दोन महिन्यांत काम सुरु होईल

वॉशिंगटन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भाषणे हिंदी आणि आशियातील इतर भाषांमध्ये भाषांतरित करण्याची मागणी केली जात आहे. राष्ट्राध्यक्ष आयोगाने राष्ट्राध्यक्ष कार्यालयासमोर आपले विचार मांडले आहेत. यात म्हटले आहे की, अमेरिकेच्या राजकारणात सातत्याने आशियाई वंशाच्या लोकांची भूमिका वाढत आहे.

त्यामुळे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भाषणांचे त्या भाषांमध्येही भाषांतर केले पाहिजे. सध्या राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उप राष्ट्राध्यक्षांचे भाषण केवळ इंग्रजीतच असते. त्यामुळे त्यांचा संदेश 2 कोटींपेक्षा जास्त लोकांपर्यंत त्यांच्या मूळ भाषेत पोहोचत नाही. राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार आयोगासमोर हा प्रस्ताव भारतीय वंशाचे नेते अजय जैन भुटोरियांनी मांडला. हा प्रस्ताव आयोगाने स्वीकारला आहे. यामुळे जो बायडेन यांचे भाषण हिंदी भाषेतूनही उपलब्ध होईल.

अजय जैन भूटोरियो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत.
अजय जैन भूटोरियो अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत.

तीन महिन्यांत सुरु करण्याचा सल्ला

एका बैठकीत राष्ट्राध्यक्ष आयोगाने सल्ला दिला आहे की भाषणे हिंदी आणि आशियाई भाषांत भाषांतरित करण्याचे काम 3 महिन्यांत सुरु केले पाहिजे. आयोगाने भाषण हिंदी, चीनी, कोरियन, व्हिएतनामी, मँडेरिन आणि फिलिपिन्समधील टगालोग भाषेत भाषांतरित करण्यास सांगितले आहे.

हेही वाचा -

सल्लागार म्हणाले:मोदी यांना ग्लोबल लीडर मानतात अध्यक्ष जो बायडेन

जो बायडेन यांची उदार वृत्ती...:डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय फिरवला, पाकला 4 वर्षांसाठी 3,600 कोटी रुपये मंजूर​​​​​​​

बातम्या आणखी आहेत...