आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
20 जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेत असलेले जो बायडेन यांनी आपले सर्वात महत्त्वाचे निवडणुकीचे आश्वासन पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. बायडेन यांनी कोरोनामुळे गंभीर रित्या प्रभावित झालेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी 1.9 ट्रिलियन डॉलरच्या मदत पॅकेजची घोषणा केली आहे.
हे काही टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. हे पॅकेज काँग्रेस म्हणजेच अमेरिकन संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये पारीत करावे लागणार आहे. मोकळेपणाने सांगायचे झाले तर हे पॅकेज लागू झाल्यानंतर प्रत्येक अमेरिकन नागरिकाच्या खात्यात 1400 डॉलर्स म्हणजे जवळपास 30 हजार रुपये जमा होतील.
एक विशेष गोष्ट म्हणजे बायडेन यांच्या या पॅकेजमध्ये छोट्या व्यावसायिकांनाही दिलासा देण्यात आला आहे. पॅकेजला 'अमेरिकन रेस्क्यू प्लान' असे नाव देण्यात आले आहे.
पॅकेजमध्ये कुणासाठी काय?
अमेरिकेची अर्थव्यवस्था रुळावर आणणे हाच बायडेन यांच्या पॅकेजचा हेतू आहे. व्यवसाय, शिक्षण आणि प्रत्येक अमेरिकन लोकांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पॅकेजमध्ये प्रस्तावित केलेल्या निधीच्या वाटपाच्या प्रकारावरून हे स्पष्ट झाले आहे. यासह, लसीकरणावर देखील लक्ष केंद्रित केले गेले आहे.
यामध्ये काही अडचणी येऊ शकतात का?
अवश्य येऊ शकतात. खरं तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ट्रम्प यांनी मदत पॅकेजेस आणले तेव्हा बायडेन आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाने बरेच प्रश्न उपस्थित केले होते. रिपब्लिकन पक्षाला अजूनही सिनेटमध्ये बहुमत आहे. ते अडथळा आणू शकतात. दुसरे म्हणजे, पॅकेजमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी स्वतंत्र घोषणा केलेली नाही. यावर आक्षेप असू शकतो.
बायडेन काय म्हणाले?
अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बायडेन आणि व्हाइस प्रेसिडेंट इलेक्ट कमला हॅरिस यांनी या मदत पॅकेजची घोषणा बायडेन यांचे होम टाउन विलिमिंग्टन (डेलावेयर) मध्ये केली. सामान्यतः एवढ्या मोठ्या घोषणा देशाच्या राजधानीमध्ये केल्या जातात. दरम्यान बायडेन म्हणाले - 'संकट मोठे आणि रस्ता कठीण आहे. आता आपण अजून सहन करु शकत नाही. जे करायचे आहे ते त्वरित करायचे आहे'
बायडेन यांना वाटते की, 100 दिवसात जवळपास 10 कोटी अमेरिकन नागरिकांना व्हॅक्सीनेट केले जावे. त्यांना बेरोजगारी भत्ता 300 डॉलरने वाढवून 400 डॉलर प्रत्येक महिना करायचा आहे. शाळा पुन्हा उघडण्यासाठी 130 अरब डॉलर खर्च करण्याची योजना आहे. एक कोटी 10 लाख बेरोजगारांना 400 डॉलर प्रत्येक महिन्यात मिळणे मोठा दिलासा आहे.
भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या अर्ध्यापेक्षा जास्त मदत पॅकेज
भारताची एकूण अर्थव्यवस्था जवळपास 3 ट्रिलियन डॉलरची आहे. या हिशोबाने पाहिले तर बायडेन यांनी जे मदत पॅकेज जाहीर केले आहे ते भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.