आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेत कोरोनाचे वाढते प्रकरणं आणि लसीकरणाविषयी शंका याच काळात प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन यांनी जनतेसमोर फायजर व्हॅक्सीनचा पहिला डोज घेतला आहे. यानंतर ते म्हणाले की - 'काळजी करु नका, ही लस अत्यंत सुरक्षित आहे.' बायडेन यांनी लसीकरण करण्याच्या काही तासांपूर्वी त्यांच्या पत्नी जिल यांनीही लसीकरण केले. दोघांना ही लस नेवार्क डेलावेयरच्या क्रिस्टीना हॉस्पिटल अँड रिसर्स सेंटरमध्ये देण्यात आली. दरम्यान टीव्हीचे कॅमेरेही येथे होते.
बायडेन म्हणाले - व्हॅक्सीन सुरक्षित आहे
अमेरिकेचे प्रेसिडेंट इलेक्ट जो बायडेन यांनी सोमवारी फायझर कंपनीची लस घेतली. डेमोक्रॅट पक्षाच्या या सर्वात मोठ्या नेत्याला कॅमेऱ्यासमोर लस देण्यात आली. बायडेन यांना नुकताच पहिला डोस देण्यात आला आहे. काही दिवसांनंतर, त्यांना आणखी एक डोस दिला जाईल. दुसर्या डोसची तारीख प्रेसिडेंट इलेक्ट यांची मेडिकल टीम ठरवेल. लस घ्यायला आलेल्या बायडेन यांनी वैद्यकीय पथकाला सांगितले - 'मी पूर्णपणे तयार आहे. लसचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांनी तेथे उपस्थित वैज्ञानिक आणि शास्त्रज्ञांचे आभार मानले. ही आमच्यासाठी खूप मोठी आशा आहे.'
थोड्या वेळानंतर माध्यमांशी बोलताना बायडेन म्हणाले- 'मला प्रत्येकाला हे सांगायचे आहे की लसीकरणाची भीती बाळगण्याची गरज नाही. माझी पत्नी जिल यांनी आधीच लस घेतली आहे. आपण आपल्या शास्त्रज्ञांवर आणि तज्ञांवर विश्वास ठेवला पाहिजे.'
ट्रम्प यांनी घेतली नाही लस
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्याप कोरोना लस घेतलेली नाही. उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांनी शुक्रवारी त्यांच्या पत्नीसह लस घेतली होती. व्हॅक्सीनविषयी सर्वात जास्त बोलणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ही लस घेणार की नाही याविषयी त्यांच्या टीमनेही कोणतीही माहिती दिलेली नाही. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅली मॅक्केनी यांनी शुक्रवारी सांगितले की - आमच्याकडे याविषयी सध्या कोणतीही माहिती नाही.
तीन माजी राष्ट्राध्यक्षही घेणार लस
अमेरिकेचे 3 राष्ट्राध्यक्षांनीही गेल्या महिन्यात म्हटले होते की, ते टीव्हीवर लाइव्रर इव्हेंटमध्ये व्हॅक्सीन घेऊ शकतात. असे करण्याचा हेतू लोकांना लसीविषयी असणाऱ्या शंका आणि भीती दूर करणे हा आहे. बिल क्लिंटन, जॉर्ज बुश ज्यूनियर आणि बराक ओबामा यांनी म्हटले होते की, ते टीव्हीवर लाइव्ह इव्हेंटदरम्यान लसीकरण करतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.