आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Joe Biden Vs Donald Trump | US Democratic Presidential Candidate And Former Vice President Joe Biden Clinches Nomination

अमेरिका:राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेट जो बिडेन यांच्या नावाची घोषणा, पक्षातील 1,991 प्रतिनिधींचे समर्थन

वॉशिंग्टन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे
  • बिडेन यांचा सामना विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आहे

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी डेमोक्रेट जो बिडेन यांचे नाव निश्चित झाले आहे. बिडेन यांनी ट्वीटरवरुन सांगितले की, नामाकंन भरण्यासाठी लागणाऱ्या 1,991 प्रतिनिधींचे समर्थन त्यांना मिळाले आहे. आता फक्त जनतेचे समर्थन मिळवण्यासाठी दररोज फाइट करणार, म्हणजे देशासाठी सुरू असलेली लढाई जिंकता येईल. पुढे म्हणाले की, अमेरिका सध्या अशा नेत्याची गरज आहे, जो लोकांना एकत्र करू शकेल.

बिडेन यांनी कोरोनाला निवडणुकीचा मुद्दा बनवले

अमेरिकेत 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प परत एकदा निवडणूक लढवत आहेत. बिडेन यांनी कोरोना संक्रमणाला निवडणुकीचा मुद्दा बनवला आहे. त्यांचे म्हणने आहे की, ट्रम्प यांनी महामारीशी सामना करण्यासाठी उशीराने निर्ण घेतले. तर, ट्रम्प त्यांना ‘बीजिंग बिडेन’ म्हणत, चीनचा समर्थक असल्याचे सांगत आहेत.

वांशिक भेदभावाच्या मुद्यानेही जोर धरला आहे

कोरोनामुळे अमेरिका सर्वात जास्त प्रभावित आहे. संक्रमण पसरण्यासोबतच तेथील अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे. दुसरीकडे वांशिक भेदभावाच्या मुद्द्यानेही मोठा जोर पकडला आहे. कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉयडचा पोलिस कस्टडीत मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण देशात आंदोलन पेटले आहे.

अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच्या 3 स्टेज

1. प्रायमरी इलेक्शन

वेगवेगळ्या राज्यात प्रायमरी इलेक्शनच्या माध्यमातून पक्ष आपला मजबुत दावेदार शोधतात. याशिवाय कॉकसची प्रक्रियादेखील होते. प्रायमरी इलेक्शनमध्ये नागरिकांचाही समावेश असतो, तर कॉकसमध्ये पार्टीचे पारंपारिक व्होटर आणि कार्यकर्ते सहभाग घेतात.

2. नॅशनल कन्वेंशन

प्रायमरी इलेक्शनच्या माध्यमातून जो प्रतिनिधी निवडले जातात, ते दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी मतदान करतात. या फेजमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार ठरवले जातात.

3. निवडणूक प्रचार

नामांकन भरल्यानंतर निवडणूक प्रचाराला सुरूवात होते. दोन्ही पक्षाच्या उमेदवारांमध्ये दिबेट होते. उमेदवार त्या राज्यांवर फोकसत करतो, ज्यात त्याचे पारंपारीक मतदार नसतात. शेवटी निवडणूक होऊन राष्ट्राध्यक्ष निवडला जातो.

0