आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Joe Biden Will Make The Mask Mandatory Across The United States As Soon As He Takes Office; Wake Up America After More Than A Million Patients And Nearly Two And A Half Million Deaths

अमेरिका:पदभार सांभाळताच पूर्ण अमेरिकेत मास्क अनिवार्य करणार जो बायडेन; एक कोटीहून जास्त रुग्ण आणि सुमारे अडीच लाख मृत्यूंनंतर अमेरिकेला जाग

वॉशिंग्टन9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा; मेलानिया यांची इच्छा

कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. येथे आतापर्यंत १.२८ कोटीहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असून २.४३ लाख नागरिकांनी प्राण गमावले आहेत. एवढे होऊनही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशात मास्क अनिवार्य करण्याचे प्रयत्न केले नाहीत. ते स्वत:ही मास्क लावणे टाळत होते. दुसरीकडे चांगली बाब म्हणजे २० जानेवारी २०२१ ला पदभार स्वीकारताच अमेरिकेत मास्क अनिवार्य करणार असल्याचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे. यासाठी ते राज्यांशी चर्चाही करतील. राज्यपालांनी न ऐकल्यास ते महापौरांसोबत चर्चा करतील.

याशिवाय कोरोनाचा सामना करण्यासाठी बायडेन नॅशनल सप्लाय चेन कमांडरची नियुक्ती करणार असून पॅनडेमिक टेस्टिंग बोर्डाची स्थापना करणार आहे. दरम्यान, माजी राष्ट्राध्यक्ष डी रुझवेल्ट यांनी युद्धाच्या वेळी स्थापन केलेल्या प्रॉडक्शन बोर्डाच्या धर्तीवर बायडेन यांनी हा निर्णय घेतला आहे. रुझवेल्ट यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी वॉर प्रॉडक्शन बोर्ड स्थापित केले होते. पॅनेडेमिक टेस्टिंग बोर्डाद्वारे कमी कालावधीत विक्रमी संख्येत कोरोना चाचण्या करणे. तसेच महामारीपासून बचावासाठी इतर उपाययोजना करण्यावर बायडेन यांचा भर आहे.

हे तीन निर्णयही पहिल्या दि‌‌वशीच घेऊ शकतात

हवामान बदल : बायडेन यांच्या टीमने सांगितले की, ते आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहिणार आहेत. यात ते हवामान बदलाचा सामना करण्यासाठी झालेल्या पॅरिस करारात अमेरिकेच्या वापसीची घोषणा करू शकतात. १७४ देश या मोहिमेचा भाग आहेत. मात्र ट्रम्प यांनी या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय ते अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे व समानतेशी संबंधित काही घोषणा पहिल्याच दिवशी करू शकतात.

ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा; मेलानिया यांची इच्छा

डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारायला हवा, असे मत अमेरिकेच्या प्रथम महिला आणि ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी मांडले आहे. सूत्रांनुसार, मेलानियांनी निवडणुकीवर सार्वजनिकरीत्या काहीही विधान केलेले नाही. मात्र वैयक्तिक पातळीवर ट्रम्प यांना पराभव स्वीकारण्याचा सल्ला दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे जा‌वई आणि त्यांचे वरिष्ठ सल्लागार जारेड कुशनर यांनी आधीच राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बोलताना परिस्थितीचा स्वीकार करण्यास सांगितले होते. दरम्यान, निवडणूक निकालांना न्यायालयात आव्हान देण्याचा हट्ट ट्रम्प यांनी धरला आहे.

अंतिम निकालानंतरच अभिनंदन करू : चीन

अमेरिकी राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत बहुमत प्राप्त केलेल्या जो बायडेन आणि कमला हॅरिस यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मात्र चीन, रशिया आणि मेक्सिकोसारख्या देशांनी अद्याप चुप्पी साधलेली आहे. चीनने सोमवारी बायडेन यांचे अभिनंदन करण्यास नकार दिला. आम्हाला अंतिम निकालाची प्रतीक्षा असल्याचे चीनने म्हटले आहे. दुसरीकडे, मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा ट्रम्प यांच्या आरोपांचा दाखला देत बायडेन यांना विजेता मानण्यास रशियाने नकार दिला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणाले, बायडेन यांनी स्वत:ला विजेता घोषित केले आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल अमेरिकेचे कायदे आणि प्रक्रियेनुसार ठरेल. तर ट्रम्प यांच्याप्रमाणेच रशियानेही निवडणुकीत प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. रशियाच्या निवडणूक प्रमुखांनी सोमवारी सांगितले, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत मेल इन मतांमुळे गैरप्रकार झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...