आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत भारताचा दबदबा:जो बायडेन यांचे हिंदू ट्रम्प कार्ड : हिंदूंना ठोस व्होट बँकेच्या रूपात जोडण्यासाठी डेमोक्रॅटिकने प्रथमच डेमोक्रॅटिक आघाडी बनवली!

न्यूयॉर्क / मोहंमद अली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकी राष्ट्रपती जो बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पार्टीने हिंदू मतदारांना हक्काची व्होट बँक म्हणून एकजूट करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. पक्षाचे हिंदू खासदार-आमदार आणि सल्लागारांची हिंदू डेमोक्रॅटिक आघाडी (एचडीसी) सुरू केली आहे. या आघाडीचा उद्देश हिंदू हितांचे रक्षण करणे आणि समुदायाला पक्षाशी जोडणे, असा आहे. पहिल्यांदाच डेमोक्रॅटिक पक्ष अशा प्रकारे हिंदूंपर्यंत पोहोचत आहे. पक्षाची सर्वात शक्तिशाली शाखा डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेंशन पार्टीची सर्वात शक्तिशाली विंग डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शननेही (डीएनसी) त्याला मंजुरी दिली आहे. डीएनसी निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेते. या आघाडीच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले निशीथ आचार्य म्हणाले की, ही आघाडी काळाची गरज असून आमच्यासारख्या हिंदू अमेरिकींचे ते मोठे स्वप्न होते. आम्हाला आता सशक्त व्यासपीठ मिळाले आहे.

ओबामा प्रशासनात वाणिज्य मंत्र्यांचे ज्येष्ठ सल्लागार राहिलेले निशीथ म्हणाले की, ही आघाडी आमच्या समुदायाच्या गरजा आणि आमच्या राजकीय अजेंड्याला धार देईल. एचडीसीचे समर्थन करत असलेले खासदार राजा कृष्णमूर्ती म्हणाले, ‘आमचा धार्मिक स्वतंत्र्यावर विश्वास आहे. प्रत्येकाने अमेरिकी स्वप्ने पाहावीत आणि कोणीच मागे राहू नये असे वाटते.’ ते म्हणाले, आम्हाला आपल्या संसाधनांचा वापर अधिक लोकांना निवडण्यासाठी करावा लागेल. या आघाडीतील संस्थापकांपैकी एक असलेले मुरली बालाजी म्हणाले, ‘डेमोक्रॅटिक पक्षाकडून या आघाडीला मान्यता देण्याचा अर्थ म्हणजे तुम्ही हिंदू अमेरिकींना डावलू शकत नाहीत. या आघाडीचे काम काय असेल, याबाबत बालाजी म्हणाले, ही नवी आघाडी हिंदू हितासह रक्षणापर्यंत सर्वच स्तरांवर काम करेल. जसे समुदायातील जास्त लोकांना उमेदवार म्हणून निवडणे, लोकांना मते देण्यासाठी प्रोत्साहित करणे, हिंदू समुदायाच्या मागण्या सरकारसह स्थानिक राज्य सरकारांसमोर ठेवणे आणि त्या मंजूर करून घेणे आहे.

ही आघाडी कशासाठी : भारतीय १० जागांवर निर्णायक, अनेक क्षेत्रात ४०% भारतीयांनी ट्रम्पना मतदान केले
- अमेरिकेत ३३ लाख हिंदू आहेत. चार दशकांत भारतीय समुदायाची लोकसंख्या दुप्पट, तर अमेरिकी लोकसंख्या ४% वाढली आहे.
- लोकसंख्येत १% हिस्सेदारी असतानाही ६ राज्यांत काँग्रेसच्या १० जागांवर ते निर्णायक आहेत. एवढ्याच जागांवर ते किंगमेकर आहेत. १५ शहरांच्या पालिका निवडणुकीत निर्णायक आहेत.
- हिंदू अमेरिकी देशातील श्रीमंत, प्रभावी प्रवासी समूह आहे. एका रात्रीत बायडेनसाठी २४ कोटी जमवले होते.
- एचडीसीची स्थापना सर्व्हेनंतर झाली. यात स्पष्ट झाले की २०२० च्या निवडणुकीत हिंदू-अमेरिकींनी ट्रम्पना मतदान केले होते.

बातम्या आणखी आहेत...