आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • John McAfee Pass Away Updates: Creator Of The World's Most Popular Anti virus Dies After Being Strangled In A Spanish Prison; News And Live Updates

अँटी व्हायरस निर्मात्याचा मृत्यू:जगातील सर्वात लोकप्रिय अँटी व्हायरसचा निर्माता जॉन मॅकफीचा मृत्यू, स्पेनच्या तुरुंगात गळफास घेऊन केली आत्महत्या

बार्सिलोनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॅकफी यांचे जगात 50 कोटी ग्राहक

अँटी व्हायरस सॉफ्टवेअरचे निर्माते जॉन मॅकफी यांनी बुधवारी स्पेनमधील बार्सिलोना तुरुंगात आत्महत्या केली आहे. यामुळे अमेरिकन तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे. 75 वर्षीय जॉन मॅकफी हे गेल्या नऊ महिन्यांपासून तुरुंगात होते. कर चोरी प्रकरणी स्पेनच्या न्यायालयाने मॅकफी यांना गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेकडे प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली होती. मॅकफी यांचे वकील विलाब्ला यांनी सांगितले की, स्पेन न्यायालयाच्या या निर्णयामुळे जॉन मॅकफी गेल्या काही दिवसापासून निराश होते. त्यामुळे त्यांनी नैराश्यामध्ये येऊन हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे ते म्हणाले.

मॅकफी यांच्यावर अमेरिकेत कर चोरीचा गुन्हा
प्रसिद्ध अँटी व्हायरस तज्ञ जॉन मॅकफी यांच्यावर अमेरिकेत कर चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे अटक होण्यापूर्वी ते फरार असल्याचे स्पेनच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात सांगितले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी स्पेन न्यायालयाने त्यांच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. दरम्यान, जॉन मॅकफी यामध्ये दोषी आढळले असते तर त्यांना 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली असती असेदेखील त्यांनी सांगितले.

ऑक्टोबरपासून बार्सिलोना तुरुंगात
जॉन मॅकफी हे गेल्या नऊ महिन्यांपासून स्पेनमधील बार्सिलोना तुरुगांत होते. त्यांना कर चोरी प्रकरणी ऑक्टोबर 2020 ला अटक करण्यात आली होती. तेंव्हापासून मॅकफी याच तुरुगांत शिक्षा भोगत होते.

मॅकफी यांचे जगात 50 कोटी ग्राहक
जॉन मॅकफी यांच्या अँटी व्हायरसचा जगात 50 कोटी ग्राहक वापर करत असून त्यांनी 1987 मध्ये पहिल्या अँटी व्हायरसचा शोध लावला होता. मॅकॅफी यांनी नासा, झेरॉक्स आणि लॉकहीड मार्टिन सारख्या प्रतिष्ठीत कंपन्यांत काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...