आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्माने नशीब बदलता येते, पण प्रारब्ध बदलता येत नाही, असे म्हणतात. याची नेहमीच प्रचिती येते. एका व्यक्तीचे नशीब असे फळफळले की, त्याला एका झटक्यातच तब्बल 100 कोटींची लॉटरी लागली. पण त्यानंतर काळचक्र असे फिरले की, हा व्यक्ती आपली कोट्यवधीची संपत्ती गमावून बसला. या व्यक्तीने मौजमस्तीत सर्वच पैसे उडवले. आता त्याच्याकडे बिल भरण्यासही पैसे नाहीत. एकेकाळी त्याच्याकडे एकाहून एक महागड्या कारी होत्या.
कोटींची उडाणे...
ही कहाणी आहे जॉन मॅक्गिनीज यांची... त्यांना 1997 साली 100 कोटी रुपयांची लॉटरी लागली होती. 'द सन'च्या वृत्तानुसार ही लॉटरी लागल्यानंतर जॉन यांनी अनेक महागड्या कारी खरेदी केल्या. यात बेंटले, मर्सिडीज, जग्वार, फेरारी व बीएमडब्ल्यूचा समावेश होता. त्यांचा ब्रिटनच्या साउथ लँकर्शायर भागातील बॉथवेलमध्ये तब्बल 13 कोटींचे आलिशान बंगलाही होता.
मिळाले ते सर्वकाही गमावले
जॉन यांनी लॉटरी जिंकल्यानंतर समुद्र किनारी 5 कोटी रुपयांचे एक अपार्टमेंट खरेदी केले. याशिवाय जवळपास 30 कोटींहून अधिकची रक्कम आपल्या कुटुंबावर खर्च केले. एवढेच नाही तर त्यांनी कोणताही विचार न करता कुठेही अमाप गुंतवणूक केली. त्यांना कोर्टापुढेही हजर व्हावे लागले. त्यानंतर समजले की, त्यांनी लॉटरीच्या पैशांतून जे काही कमावले होते, ते सर्वकाही गमावले.
बिल भरण्यासही पैसे नाहीत
जॉन 'द सन'शी बोलताना म्हणाले - माझ्याकडे फेरारीच्या अनेक गाड्या होत्या. अनेक आलिशान ठिकाणी मी सुट्ट्या घालवल्या. पण आता माझ्याकडे बिल भरण्यासही पैसे नाहीत. मी संपूर्ण रक्कम लग्झरी लाइफ स्टाइलवर उडवली.
जॉन मॅक्गिनीज सांगतात की, कधीकाळी माझ्याकडे डिझायनर कपडे होते. मी लग्झरी हॉलिडेवर जात होतो. मी जी स्वप्न पाहिली ती सर्व पूर्ण केली. माझ्याकडे खूपकाही होते. पण आता मला शॉपिंगचे बिल कसे द्यावे हा प्रश्न सतावत आहे. कारण, मी पूर्णतः कंगाल झालो आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.