आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Johnny Depp Vs Ex Wife Amber Heard Defamation Case । Depp Wins Case Against Heard । To Pay $15 Million In Damages

हॉलीवूड अभिनेता जॉनी डेपने खटला जिंकला:माजी पत्नी अ‍ॅम्बर हर्ड देणार 116 कोटींची भरपाई, हर्डलाही मिळणार 15 कोटी रुपये

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलीवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्याची माजी पत्नी अ‍ॅम्बर हर्ड यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या मानहानीच्या खटल्यात व्हर्जिनिया न्यायालयाने बुधवारी निर्णय दिला. 6 आठवडे चाललेल्या या चाचणीत जॉनी डेपने बाजी मारली आहे. डेपला 15 मिलियन डॉलर्स (सुमारे 116 कोटी रुपये) नुकसान भरपाई मिळेल. त्याच वेळी हर्डलाही 2 मिलियन डॉलर्स (सुमारे 15.5 कोटी रुपये) भरपाई देण्याचा निर्णयदेखील देण्यात आला आहे.

वास्तविक, हर्डने डेपवर कौटु्ंबिक हिंसाचाराचा खटला दाखल केला. त्यानंतर अभिनेत्याने हर्डच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. अभिनेत्री अंबर हर्ड हिने जॉनी डेपवर अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचा दावा केला आहे. हर्ड यांनी न्यायालयाच्या निर्णयाला निराशाजनक म्हटले आहे. या निर्णयामुळे मी निराशा असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच वेळी, डेप म्हणाला की, ज्युरींनी मला माझे आयुष्य परत दिले.

हर्डच्या लेखाने डेपची बदनामी

व्हर्जिनियामधील सात सदस्यीय ज्युरीला असे आढळले की, हर्डने 2018 च्या लैंगिक हिंसाचारावर डेपच्या विरोधात एक लेख लिहिला होता. या लेखामुळे डेपची प्रतिष्ठा मलिन झाली. हा लेख दुर्भावनापूर्ण हेतूने लिहिला गेला असल्याचे आढळले.

ज्युरीने डेप आणि त्याची माजी पत्नी अ‍ॅम्बर हर्ड या दोघांनाही बदनामीसाठी जबाबदार धरले आहे. ज्युरीला असेही आढळले की, डेपचे वकील अ‍ॅडम वाल्डमन यांनी हर्डच्या विरोधात विधाने केली ज्यामुळे तिच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला. त्यामुळे हर्डलाही 2 मिलियन डॉलर्स भरपाई मिळेल.

हर्डने म्हटले - इतर महिलांनाही या निर्णयाचा धक्का बसेल

या निकालावर प्रतिक्रिया देताना हर्डने महिलांसाठी हा धक्का असल्याचे म्हटले आहे. आज मला जी निराशा वाटते ती शब्दांपलीकडची आहे, असे ती म्हणाली. माझ्या माजी पतीच्या अमर्याद शक्ती, प्रभाव आणि प्रसिद्धीचा सामना करण्यासाठी इतके पुरावे पुरेसे नव्हते याचे मला दु:ख आहे.

हर्ड म्हणाली की, या निर्णयामुळे इतर महिलांनाही धक्का बसेल. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराचे गांभीर्य कमी होईल. हर्ड आणि डेपने 2015 मध्ये लग्न केले होते. मे 2016 मध्ये हर्डने डेपवर घरगुती हिंसाचाराचा आरोप दाखल केला आणि 2017 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. हर्डने डेपवर बळजबरीने सेक्स आणि अंमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप केला होता.

बातम्या आणखी आहेत...