आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरिसविरोधात बंडखोरी:ब्रिटनमध्ये जॉन्सन अविश्वास प्रस्ताव जिंकले; पण सत्तेवरील पकड सैल

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन अविश्वास प्रस्ताव जिंकले आहेत. असे असतानाही त्यांच्या सत्ताधारी काँझर्व्हेटिव्ह पक्षातील अंतर्गत बंडाळी वाढत चालली आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, बोरिसविरोधात त्यांच्या पक्षाने बंडखोरी सुरू केली आहे. त्यांच्याकडे बहुमत असले तरी सत्ताधारी पक्षात असलेली नाराजी पंतप्रधानांचा मार्ग आणखी खडतर करत आहे. पंतप्रधानपदी कायम राहण्यासाठी त्यांची सत्तेवरील पकड सैल होत चालली आहे.

अविश्वास प्रस्तावात ३५९ सदस्यांपैकी जॉन्सन यांच्या पारड्यात २११ मते पडली. तर १४८ खासदारांनी त्यांच्याविरोधात मतदान केले. यापूर्वी २०१८ मध्ये थेरेसा मे यांना अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला होता. त्या जिंकल्याही होत्या, पण ६ महिन्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला. नियमानुसार एखादा पीएम अविश्वास प्रस्ताव जिंकतो तेव्हा १२ महिने दुसरा प्रस्ताव सादर होऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...