आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्यूयॉर्क येथून ‘भास्कर’साठी मोहम्मद अली
२००८ ची गोष्ट. १६ वर्षीय युवकाला न्यूयॉर्कच्या केनेडी विमानतळावर अमेरिकी पोलिसांनी रोखले आणि एका खोलीत नेले. तू कुठल्या दहशतवादी शिबिरात गेला होतास का आणि अमेरिकेवर हल्ला करण्याचा तुझा विचार आहे का, असे प्रश्न पोलिसांनी त्याला विचारले. आज १२ वर्षांनंतर तोच मुलगा याच न्यूयॉर्कमध्ये कायदे बनवणार आहे. ही गोष्ट आहे जोहरान ममदानींची, ते प्रख्यात चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर आणि कोलंबिया विद्यापीठातील प्रा. महमूद ममदानी यांचे चिरंजीव आहेत. अॅस्टोरिया मतदारसंघातून निवडून गेलेले जोहरान न्यूयॉर्क असेंब्लीची निवडणूक जिंकणारे पहिले भारतीय आहेत. ते १९९९ पासून न्यूयॉर्कमध्ये राहत आहेत. निकालानंतर जोहरान यांनी ‘दैनिक भास्कर’शी चर्चा केली. स्मितहास्य करत जोहरान म्हणाले,‘भारतात आमदार झाल्यावर संरक्षणासाठी बंदूकधारी चार पोलिस असतात. मला येथे कुठलेही संरक्षण नाही.’ जोहरान कुर्ता आणि जीन्स परिधान करतात. मग आई मीरा नायर यांच्यासोबत सेलिब्रिटी शोमध्ये जायचे असले किंवा आपल्या मतदारसंघातील लोकांच्या हक्कासाठी आंदोलन करत असले तरीही. त्यांचे स्मितहास्य ट्रेडमार्क बनले आहे.
डेमोक्रॅटिक जोहरान बर्नी सँडर्सच्या सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाशी संबंधित आहेत. आता ते सोशालिस्ट लॉ मेकर्स झाले आहे. त्यांनी एका एनजीओसोबत हाउसिंग कौन्सिलर म्हणून काम सुरू केले. गृह कर्ज फेडले तरीही घराबाहेर हाकलून दिले जाण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शेकडो लोकांना ते भेटले आणि हेच त्यांच्या निवडणूक लढण्याचे प्रमुख कारणही ठरले. जोहरान म्हणाले,‘कोणाचेही घराचे स्वप्न भंग पावू नये हे सुनिश्चित करण्यासाठीच मी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मी प्रचार मोहिमेत लोकांना घर देण्याचे आश्वासन दिले आहे. वाढत्या घर भाड्यावर अंकुश लावणे यालाही माझे प्राधान्य आहे.’ त्यांच्या अॅस्टोरिया मतदारसंघात १४.२% आशियाई अमेरिकन, ८.२% कृष्णवर्णीय आणि २४.४% हिस्पॅनिक आहेत. जोहरान म्हणाले, ‘येथे राहणाऱ्या दक्षिण आशियाई लोकांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी मी संघर्ष करणार आहे. हे लोक या शहराच्या संस्कृतीचा मोठा भाग आहेत, पण त्यांना राजकीदृष्ट्या महत्त्व नाही. येथे १३.३ लाख एवढ्या मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक राहतात.’
जोहरान रॅप गाणी लिहितात आणि त्यावर परफॉर्मही करतात
२०२० च्या आधी न्यूयॉर्कमध्ये जोहरान यांची ओळख रॅपर म्हणून होती. ते रॅप गाणी लिहीत आणि परफॉर्म करत असत. त्यांचे नाव लहान विलायची (यंग कार्डमाम) आहे आणि त्यांनी ‘नानी’ हे रॅप गाणे एप्रिलमध्ये रिलीज केले. त्यात त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री मधुर जॅफ्रे हिला एका कूल गॅँगस्टरच्या भूमिकेत दाखवले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.