आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी पतंप्रधान इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तपास करणाऱ्या संयुक्त तपास यंत्रणेने (JIT)मोठा खुलासा केला आहे. JITनुसार इम्रान खान यांच्यावर एका शुटरने नाहीतर तब्बल 4 शुटर्सनी गोळीबार केला होता. यापैकी एकच शुटर नवीद मेहर हा घटनास्थळावरुन सापडला. तर बाकी तिन शूटर कोण होते, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
3 नोव्हेंबर 2022 रोजी लॉन्ग मार्चदरम्यान इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी इम्रान खान आपल्या समर्थकांसह कंटेनरवर उभे होते. हल्ल्यात त्यांचे अनेक समर्थक जखमी झाले होते.
3 शुटर्सनी उंचीवरुन केला गोळीबार
JITच्या एका सदस्यानुसार, नवीदशिवाय आणखी तिन शुटर्सनी उंचीवरुन गोळीबार केला होता. JIT चा तपास जवळपास पुर्ण झाला आहे. पंजाब फॉरेन्सिक सायन्स एजन्सीचा रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे. यानंतर तपास रिपोर्ट जारी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
हल्ल्यात 13 जणांना गोळी लागली
JITनुसार हल्ल्यात 13 जणांना गोळी लागली होती. तसेच लॉन्ग मार्चमधील सुरक्षेत अनेक चूक होत्या. JIT स्थापना ही पंजाब सरकारने केली आहे. लाहोरचे अतिरिक्त आयजी गुलाम मेहमूद डोगर यांना जेआयटीचे प्रमुख बनवण्यात आले आहे.
पॉलिग्राफ टेस्टमध्ये नवीद फेल
पाकिस्तानच्या पंजाब प्रातांचे गृहमंत्री ओमार सरफराज चीमा यांनी सांगितले की, इम्रान खान यांच्यावर झालेला हल्ला नियोजित होता. नवीद हा एक प्रशिक्षण घेतलेला हल्लेखोर आहे. तो आपल्या साथिदारासोबत घटनास्थळी उपस्थित होता. नवीद पॉलीग्राफ टेस्टमध्ये फेल झाला. त्याने पोलिसांना सांगितले की, इम्रान यांच्या लॉन्ग मार्चमध्ये अजानच्यावेळी DJ वाजत होता. त्यामुळे मला इम्रान यांची हत्या करायची होती.
इम्रान यांच्या पायाला लागल्या 3-4 गोळ्या
इम्रान यांच्या उजव्या पायाला गोळी लागली आहे. ते जखमी असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेत इम्रान यांच्या 'पाकिस्तान तहरिक ए इंसाफ पक्षा'चे (पीटीआय) खासदार फैजल जावेद यांच्यासह त्यांचे 4 कार्यकर्ते जखमी झालेत. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. येथे वाचा पुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.