आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Journalist Live Reporter In Egypt, Thief Snatched It From The Journalist's Hand More Than 20,000 People See Thief's Face

पत्रकाराचा मोबाईल चोरणे पडले महागात:इजिप्तमध्ये लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराच्या हातातून चोरट्याने हिसकला मोबाईल, लाईव्ह सुरु असल्याने 20 हजारांपेक्षा जास्त जणांनी पाहिला चोरट्याचा चेहरा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इजिप्तमध्ये एका चोराला मोबाईल चोरणे महागात पडले आहे. लाईव्ह रिपोर्टिंग करत असलेल्या एका पत्रकाराचा मोबाईल हिसकावून चोर पसार होत होता. त्याचदरम्यान मोबाईलमध्ये लाईव्ह सुरु होते. सुमारे 20 हजारांपेक्षा जास्त जणांनी त्या चोराचा चेहरा पाहिला होता. आता त्या चोराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना इजिप्तची राजधानी काहिरा येथे घडली आहे. तेव्हा एक पत्रकार भुकंपाची लाईव्ह रिपोर्टिंग करत होता.

त्याचदरम्यान मागून एक चोर आला आणि त्याने पत्रकाराच्या हातातून मोबाइल घेत पसार झाला. त्यात लाईव्ह सुरु आहे. हे त्याच्या लक्षात आले नाही, चोराने लाईव्हमध्ये सिगारेट ओढली. त्यामुळे त्याचा चेहरा लाईव्हद्वारे हजारो जणांनी पाहिला. सध्या हा व्हिडिओ वेगाने पसरत असून, या व्हिडिओला आतापर्यंत सुमारे 62 लाख जणांनी पाहिले आहे.

चोर पोलीसांच्या ताब्यात
पोलीसांनी सदरील चोराला ताब्यात घेतले असून, चोरीदरम्यान वापरण्यात आलेली दुचाकी देखील ताब्यात घेण्यात आली आहे. बेरोजगार असल्यामुळे त्याने चोरी करून, तो मोबाइल दुसऱ्याला विकला होता.

बातम्या आणखी आहेत...