आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणी एलिझाबेथ-II यांचे निधन:25 व्या वर्षी आल्या होत्या गादीवर; 17 फोटोंमधून पाहा, महाराणींचा जीवन प्रवास...

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ-II यांचे निधन झाले आहे. 6 फेब्रुवारी 1952 रोजी किंग जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर त्या ब्रिटनच्या गादीवर विराजमान झाल्या होत्या. तेव्हा त्या फक्त 25 वर्षांच्या होत्या. तेव्हापासून 70 वर्षांपर्यंत त्या गादीवर राहिल्या. 2 दिवसांपूर्वीच त्यांनी ब्रिटनच्या 15 व्या पंतप्रधान लिझ ट्रस यांना शपथ दिली होती. एलिझाबेथ-II या ब्रिटनच्या इतिहासात दीर्घ काळ गादीवर राहिलेल्या पहिल्या महिला महाराणी आहेत. चला काही एक्सक्लुझिव्ह फोटोंमधून पाहूया महाराणींचा जीवन प्रवास...

1947
एलिझाबेथ यांनी आपले जीवन समाजकार्यासाठी समर्पित केले

राजकुमारी एलिझाबेथ यांनी 21 एप्रिल 1947 रोजी त्यांच्या वाढदिवशी पहिले संबोधन आफ्रिकेची राजधानी केप टाऊनमध्ये रेडिओवरून दिले होते.
राजकुमारी एलिझाबेथ यांनी 21 एप्रिल 1947 रोजी त्यांच्या वाढदिवशी पहिले संबोधन आफ्रिकेची राजधानी केप टाऊनमध्ये रेडिओवरून दिले होते.

राजकुमारी एलिझाबेथ यांनी देशाला उद्देशून आपले पहिले संबोधन वयाच्या 21 व्या वर्षी दिले होते. त्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. त्यावेळी दक्षिण आफ्रिका ब्रिटिश राजवटीचा भाग होता. या संबोधनात त्या म्हणाल्या होत्या की, मी माझे संपूर्ण जीवन समाज आणि कुटुंबाच्या सेवेसाठी समर्पित करत आहे. आम्ही सर्व एका कुटुंबाचा भाग आहोत. तेव्हा त्या क्वीन नव्हत्या. फक्त राजकुमारी होत्या.

1953
राज्यारोहण

हा फोटो महाराणी एलिझाबेथ-II आणि त्यांचे पति फिलिप यांचा आहे. 2 जून 1953 रोजी महाराणींच्या राज्यारोहण प्रसंगी बकिंघम पॅलेसमध्ये हा फोटो काढण्यात आला होता.
हा फोटो महाराणी एलिझाबेथ-II आणि त्यांचे पति फिलिप यांचा आहे. 2 जून 1953 रोजी महाराणींच्या राज्यारोहण प्रसंगी बकिंघम पॅलेसमध्ये हा फोटो काढण्यात आला होता.

फेब्रुवारी 1952 मध्ये सर्वकाही बदलले. दीर्घ काळापासून आजारी असलेले एलिझाबेथ यांचे वडील किंग जॉर्ज यांचे निधन झाले. आता ब्रिटनला नव्या महाराणी मिळणार होत्या. वयाच्या केवळ 25 व्या वर्षी एलिझाबेथ-II ब्रिटनच्या गादीवर विराजमान झाल्या. जून 1953 मध्ये त्यांचा अधिकृतरित्या राज्याभिषेक करण्यात आला. हा कार्यक्रम प्रथमच टीव्हीवर दाखवण्यात आला. यादरम्यान एलिझाबेथ म्हणाल्या होत्या, या नव्या जबाबदारीसाठी माझ्याकडे खूपच कमी अनुभव आहे. पालकांनी ज्या पद्धतीने सर्वकाही सांभाळले, मी तसेच काम करेल. याप्रसंगी मी सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छिते.

1957
अमेरिकेचा पहिला दौरा

हा फोटो 17 ऑक्टोबर 1957 चा आहे. यात महाराणी एलिझाबेथ-II त्यांचे पती राजकुमार फिलिप आणि राष्ट्राध्यक्ष ड्वाएट दी आयझेनहॉवर आणि फर्स्ट लेडी मॅमी आयझेनहॉवर आहेत.
हा फोटो 17 ऑक्टोबर 1957 चा आहे. यात महाराणी एलिझाबेथ-II त्यांचे पती राजकुमार फिलिप आणि राष्ट्राध्यक्ष ड्वाएट दी आयझेनहॉवर आणि फर्स्ट लेडी मॅमी आयझेनहॉवर आहेत.

महाराणी एलिझाबेथ-II यांनी त्यांच्या संपूर्ण जीवनकाळादरम्यान 90 देशांचा दौरा केला. त्यांनी भारत, रशिया, दक्षिण आफ्रिकासारख्या देशांसोबतचे संबंध आणखी मजबूत बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 1951 मध्ये एलिझाबेथ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस ट्रुमॅन यांची भेट घेतली. तेव्हा त्या राजकुमारी होत्या. 1957 मध्ये महाराणी एलिझाबेथ-II यांनी अमेरिकेचा अधिकृत दौरा केला. यादरम्यान त्या तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ड्वाएट दी आयझेनहॉवर यांच्याशी भेटल्या होत्या.

1957
टीव्हीवर पहिले संबोधन

महाराणी एलिझाबेथ-II स्मितहास्य करत आहेत. हा फोटो त्यांच्या टीव्हीवरील पहिल्या ख्रिसमस संबोधनादरम्यान काढण्यात आला होता.
महाराणी एलिझाबेथ-II स्मितहास्य करत आहेत. हा फोटो त्यांच्या टीव्हीवरील पहिल्या ख्रिसमस संबोधनादरम्यान काढण्यात आला होता.

महाराणी एलिझाबेथ-II यांनी कधीही मुलाखत दिली नाही. मात्र त्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जनतेपर्यंत त्यांची मन की बात पोहोचवत राहायच्या. जनतेसोबतचे संबंध जोपासणे त्यांना चांगल्या पद्धतीने येत होते. त्या दरवर्षी ख्रिसमसच्या दिवशी संबोधन द्यायच्या. ही ब्रिटिश हॉलिडे परंपरा होती. 1957 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांनी प्रथम टीव्हीच्या माध्यमातून लोकांना संबोधित केले.

1965
बकिंघम पॅलेसमध्ये 'बीटलमेनिया'

हा फोटो 26 ऑक्टोबर 1965 चा आहे. पोलिस दल 'बीटल्स' फॅन्सना पॅलेसमध्ये जाण्यापासून रोखत आहेत.
हा फोटो 26 ऑक्टोबर 1965 चा आहे. पोलिस दल 'बीटल्स' फॅन्सना पॅलेसमध्ये जाण्यापासून रोखत आहेत.

ऑक्टोबर 1965 मध्ये प्रसिद्ध म्युझिक बँड 'बीटल्स'चे सदस्य महाराणींना भेटण्यासाठी बकिंघम पॅलेसमध्ये आले होते. बँडचे सदस्य जॉन लेनन, पॉल मेकार्टनी, जॉर्ज हॅरिसन आणि रिंगो स्टारची एक झलक बघण्यासाठी तिथे चाहत्यांचीही गर्दी उसळली होती. लोक पॅलेसच्या गेटवर चढून आत शिरण्याचा प्रयत्न करत होते. महाराणीच्या पॅलेसबाहेर पोलिस तैनात होते. त्यांनी बँड मेंबर्सना सन्मानित केले. पॉल मॅक्कार्टनी महाराणींना भेटल्यानंतर म्हणाले होते की, त्या खूपच फ्रेंडली होत्या.

1966
अॅबरफान खाण दुर्घटना

भूस्खलनाच्या घटनेच्या 8 दिवसांनंतर महाराणी एलिझाबेथ-II आणि प्रिंस फिलिप पीडितांना भेटण्यासाठी वेल्समध्ये गेले होते.
भूस्खलनाच्या घटनेच्या 8 दिवसांनंतर महाराणी एलिझाबेथ-II आणि प्रिंस फिलिप पीडितांना भेटण्यासाठी वेल्समध्ये गेले होते.

21 ऑक्टोबर 1966 रोजी साऊथ वेल्समधील अॅबरफानमध्ये जोरदार पावसानंतर भूस्खलन झाले. यात 144 लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतांश बालके होते. या दुर्घटनेच्या 8 दिवसांनंतर महाराणी एलिझाबेथ-II आणि प्रिंस फिलिप पीडातांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. यानंतर त्यांना टीकेचाही सामना करावा लागला.

1969
अपोलो 11 मोहिमेच्या अंतराळवीरांशी भेट

या फोटोत मायकल कोलिन्स, नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्ड्रीन महाराणी-II यांच्यासोबत दिसतात. महाराणींनी त्यांचे स्वागत केले होते.
या फोटोत मायकल कोलिन्स, नील आर्मस्ट्राँग आणि बझ एल्ड्रीन महाराणी-II यांच्यासोबत दिसतात. महाराणींनी त्यांचे स्वागत केले होते.

चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती नील आर्मस्ट्राँग, बझ एल्ड्रीन आणि मायकल कोलिन्स यांनी ग्लोबल गूडवील दौऱ्यादरम्यान 14 ऑक्टोबर 1969 रोजी बकिंघम पॅलेसमध्ये महाराणी एलिझाबेथ-II यांची भेट घेतली होती. यादरम्यान एक विनोदी किस्सा घडला होता. याविषयी सांगताना आर्मस्ट्राँग म्हणाले होते, मी त्या दिवशी खूप आजारी होतो. त्या इव्हेंटला जाऊ नये असा विचार मी करत होतो. पण मी गेलो आणि महाराणींना भेटल्यावर मला खोकला आला. कोलिन्सही पायऱ्यांवरून पडले होते.

1970
पहिला शाही दौरा

सिडनीत महाराणी एलिझाबेथ-II यांच्यासोबत तिथले महापौर अॅम्मेट मैक्डरमोट होते. तेव्हा महाराणींनी लेमन यलो रंगाचा ड्रेस आणि पांढऱ्या रंगाची हॅट घातली होती.
सिडनीत महाराणी एलिझाबेथ-II यांच्यासोबत तिथले महापौर अॅम्मेट मैक्डरमोट होते. तेव्हा महाराणींनी लेमन यलो रंगाचा ड्रेस आणि पांढऱ्या रंगाची हॅट घातली होती.
1977 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान महाराणी एलिझाबेथ-II यांनी माओरी जमातीच्या लोकांची भेट घेतली होती.
1977 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान महाराणी एलिझाबेथ-II यांनी माओरी जमातीच्या लोकांची भेट घेतली होती.

पहिल्या शाही दौऱ्यादरम्यान महाराणी एलिझाबेथ-II यांनी शतकांपासून सुरू असलेली परंपरा मोडीत काढली. लोकांना दूरुनच अभिवादन करण्याऐवजी त्या लोकांना जवळ जाऊन भेटल्या होत्या. पहिला शाही दौरा त्यांनी 1970 मध्या ऑस्ट्रेलियात केला होता. यादरम्यान त्या सिडनीच्या लोकांमधून गेल्या होत्या.

1981
चार्ल्स आणि डायना यांचा विवाह

हा फोटो 27 मार्च 1981 मधील आहे. यात महाराणी एलिझाबेथ-II मुलगा प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेंसर यांच्यासोबत आहेत.
हा फोटो 27 मार्च 1981 मधील आहे. यात महाराणी एलिझाबेथ-II मुलगा प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेंसर यांच्यासोबत आहेत.

29 जुलै 1981 रोजी प्रिन्स चार्ल्स आणि डायना स्पेन्सर यांचा विवाह झाला. त्यांची एक झलक पाहण्यासाठी सेंट्रल लंडनमध्ये लोकांची गर्दी उसळली होती. लोकांना प्रिन्सेस डायना आवडत होत्या. पण त्यांचे आणि चार्ल्स यांचे संबंध ठिक नव्हते. लग्नाच्या 11 वर्षांनंतर 1992 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता.

1986
चीन दौरा करणाऱ्या पहिल्या महाराणी

1986 मध्ये चीन दौऱ्यादरम्यान महाराणी एलिझाबेथ-II आणि राजकुमार फिलिप यांनी ग्रेट वॉल ऑफ चायनाला भेट दिली होती.
1986 मध्ये चीन दौऱ्यादरम्यान महाराणी एलिझाबेथ-II आणि राजकुमार फिलिप यांनी ग्रेट वॉल ऑफ चायनाला भेट दिली होती.

1986 मध्ये एलिझाबेथ यांनी चीनचा दौरा केला. चीन दौरा करणाऱ्या त्या पहिल्या ब्रिटिश महाराणी होत्या. त्यांच्यापूर्वी राष्ट्रपती रिचर्ड निक्सन आणि पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांनी चीनचा दौरा केला होता. हा दौरा ब्रिटनचा राजनयिक प्रयत्न म्हणून गणला जात होता.

1996
नेल्सन मंडेलांचे स्वागत

नेल्सन मंडेला आणि महाराणी एलिझाबेथ-II यांचा हा फोटो बकिंघम पॅलेसमधील आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान मंडेलांनी वेस्टमिनिस्टर हॉलमध्ये संसदेला संबोधित केले होते.
नेल्सन मंडेला आणि महाराणी एलिझाबेथ-II यांचा हा फोटो बकिंघम पॅलेसमधील आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान मंडेलांनी वेस्टमिनिस्टर हॉलमध्ये संसदेला संबोधित केले होते.

जुलै 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती नेल्सन मंडेला 4 दिवसीय ब्रिटन दौऱ्यावर आले होते. मंडेलांच्या दौऱ्यादरम्यान त्यांची महाराणींसोबत चांगलीच मैत्री झाली होती. महाराणींनी मंडेलांना बकिंघम पॅलेसमध्ये निमंत्रित केले. यानंतर दोघे सेंट्रल लंडनमध्ये फिरतानाही दिसले होते.

1997
डायनांचा मृत्यू

हा फोटो 1997 मध्ये बकिंघम पॅलेसमध्येृ वेल्सच्या दिवंगत राजकुमारी डायना यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीदरम्यान घेण्यात आला होता.
हा फोटो 1997 मध्ये बकिंघम पॅलेसमध्येृ वेल्सच्या दिवंगत राजकुमारी डायना यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीदरम्यान घेण्यात आला होता.

31 ऑगस्ट 1997 रोजी डायना पॅरिसमधील डिनरनंतर गाडीतून निघालेल्या असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी ऐकताच डायनांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. या बातमीविषयी महाराणींची प्रतिक्रिया खूप उशीरा समोर आली. यानंतर शाही कुटुंबाला टीकेचाही सामना करावा लागला.

2007
पहिल्या टीव्ही संबोधनाची 50 वर्षे

2007 मध्ये महाराणी एलिझाबेथ-II यांनी ख्रिसमस डे मॅसेज रेकॉर्ड केला होता. तो यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला होता.
2007 मध्ये महाराणी एलिझाबेथ-II यांनी ख्रिसमस डे मॅसेज रेकॉर्ड केला होता. तो यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला होता.

वर्ष 2007 मध्ये महाराणी एलिझाबेथ-II यांच्या पहिल्या टीव्ही संबोधनाला 50 वर्षे पूर्ण झाले होते. यादरम्यान त्यांनी एक स्पीच रेकॉर्ड केले होते. स्पीचमध्ये त्या म्हणाल्या होत्या, वय वाढण्याचे एक वैशिष्ट्य आहे की तुम्ही तुमच्या आजुबाजुला होणारे बदल बघू आणि अनुभवू शकता. 50 वर्षांपूर्वी जे झाले, त्याची आठवण करताना आतापर्यंत झालेल्या बदलांचे कौतुक केले जाऊ शकते. काय बदलले नाही हेही तुम्हाला माहिती असते.

2012
लंडन ऑलिम्पिक

महारानी एलिझाबेथ स्टेडियममध्ये आल्यानंतर ब्रिटनचा झेंडा फडकावण्यात आला आणि राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
महारानी एलिझाबेथ स्टेडियममध्ये आल्यानंतर ब्रिटनचा झेंडा फडकावण्यात आला आणि राष्ट्रगीत म्हणण्यात आले.

2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभात महाराणी एलिझाबेथ-II यांनी लोकांना सरप्राईज दिले. प्रसिद्ध गुप्तहेर जेम्स बॉन्डची भूमिका करणारे अभिनेते डॅनिएल क्रेग यांच्यासोबत त्या उद्घाटन समारंभात पोहोचल्या. एका व्हिडिओत दाखवण्यात आले की जेम्स बॉन्ड(डॅनिएल क्रेग) ब्रिटनच्या महाराणींना आणण्यासाठी पॅलेसमध्ये गेले. दोघे तिथून सोबतच हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि स्टेडियमच्या दिशेने रवाना झाले. हेलिकॉप्टर हवेत होते, तेव्हा महाराणी आणि जेम्स बॉन्ड यांनी हेलिकॉप्टरमधून पॅराशूटमधून उडी मारली. यासाठी महाराणींच्या बॉडी डबलचा वापर करण्यात आला होता.

2020
प्रिंस हॅरी आणि मेघन मर्केल शाही कुटुंबापासून वेगळे झाले

19 मे 2018 रोजी ब्रिटनच्या विंडसरमधील सेंट जॉर्ज चॅपलमध्ये दोघांचा विवाह झाला होता. एक वर्षानंतरत मेघन महालाला कैदखाना म्हणत बोलल्या होत्या की, त्यांना तिथे गुदमरल्यासारखे वाटते.
19 मे 2018 रोजी ब्रिटनच्या विंडसरमधील सेंट जॉर्ज चॅपलमध्ये दोघांचा विवाह झाला होता. एक वर्षानंतरत मेघन महालाला कैदखाना म्हणत बोलल्या होत्या की, त्यांना तिथे गुदमरल्यासारखे वाटते.

2018 मध्ये ब्रिटनच्या शाही कुटुंबातील प्रिंस हॅरी आणि मेघन मर्केल यांनी विवाह केला होता. ऑक्टोबर 2019 मध्ये बातम्या यायला लागल्या होत्या की, या दोघांमध्ये सर्वकाही ठिक नाही. अखेर माध्यमांतील बातम्या खऱ्या ठरल्या आणि 9 जानेवारी 2020 मध्ये शाही कुटुंबापासून वेगळे होण्याची घोषणा केली. यानंतर दाम्पत्याने रॉयल हायनेस ही उपाधी आणि शाही कुटुंबाकडून मिळणाऱ्या सुविधांचाही त्याग केला.

2021
प्रिन्स फिलिप यांचे निधन

प्रिंस फिलिप एलिझाबेथ यांना प्रेमाने 'लिलिबेट' म्हणायचे. प्रिंस यांच्या निधनानंतर महाराणी एलिझाबेथ-II खूप वेळ सेंट जॉर्ज चॅपलमध्ये एकट्या बसून होत्या.
प्रिंस फिलिप एलिझाबेथ यांना प्रेमाने 'लिलिबेट' म्हणायचे. प्रिंस यांच्या निधनानंतर महाराणी एलिझाबेथ-II खूप वेळ सेंट जॉर्ज चॅपलमध्ये एकट्या बसून होत्या.

प्रिंस फिलिप यांचे 9 एप्रिल 2021 रोजी निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. महाराणी एलिझाबेथ-II आणि त्यांच्या विवाहाला 73 वर्षे पूर्ण झाली होती. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनदरम्यान ते लंडनमध्ये विंडसर कॅसलमध्ये महाराणींसोबत राहत होते.

बातम्या आणखी आहेत...