आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Judges Lift Gun Ban, Citing Constitutional Right To Bear Arms; 3 decade Ban On Guns In California, News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:शस्त्र बाळगणे घटनात्मक अधिकार सांगून न्यायमूर्तींनी बंदुकीवरील बंदी उठवली; अमेरिकेतील कॅलिफोर्नियात बंदुकांवर 3 दशकांपासून निर्बंध

कॅलिफोर्निया15 दिवसांपूर्वीलेखक: शॉन हुब्लर, ॲडम लिप्टाक
  • कॉपी लिंक
  • 1989 मधील गोळीबारात 5 विद्यार्थ्यांचा मृत्यू

अमेरिकेच्या फेडरल कोर्टातील न्यायमूर्तींनी कॅलिफोर्नियातील बंदुकींवरील तीस वर्षे जुन्या बंदीस उठवले आहे. शस्त्र बाळगणे हा संविधानिक अधिकार आहे. बंदी लागू करणे अधिकारांचे उल्लंघन ठरेल, असे जजने स्पष्ट केले. सॅन दिएगोतील न्यायमूर्ती रोजर बेनिटोज यांनी हा आदेश दिला. लष्करी शैलीची बेकायदा रायफलीबाबतची सरकारची परिभाषा कॅलिफोर्नियाच्या कायद्याचे पालन करणाऱ्यांना शस्त्र बाळगण्याच्या हक्कापासून वंचित ठेवणारी आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने इतर बहुतांश राज्यात शस्त्र बाळगण्याची परवानगी दिली आहे. हा कायदा स्थायी रुपात रद्द करण्याचे आदेश त्यांनी दिला.

अॅटॉर्नी जनरल रॉब बोंटा यांच्या विनंतीनुसार कोर्टाने आपल्या आदेशाला ३० दिवसांसाठी स्थगित ठेवले आहे. या काळात बोंटा यांना अपील करण्यासाठी पुरेसा अवधी मिळू शकेल. जज बेनिटेज यांनी निकालात एआर-१५ रायफल लोकप्रिय असल्याचे म्हटले. राज्यात एक बंदुकीबाबत एक धोरण लागू केले जावे. कारण ३० वर्षांपूर्वीचा जुना कायदा आता उपयोगी नाही. राज्याचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी या निर्णयावर टीका केली.

हा निर्णय लोकांची सुरक्षा व निर्दोष लोकांच्या जीवितासाठी धोकादायक ठरू शकतो. अमेरिकन बार असोसिएशनने (एबीए) रोजर बेनिटेज यांना ‘अयोग्य रेटिंग’ दिली आहे. २००४ मध्ये एबीएच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे वर्णन अहंकारी, स्वार्थी असे होते.

१९८९ मधील गोळीबारात ५ विद्यार्थ्यांचा मृत्यू
१९८९ मध्ये एका बंदुकधाऱ्याने कॅलिफॉर्नियात एका प्राथमिक शाळेत केलेल्या गोळीबारात पाच मुलांची हत्या झाली होती. सुमारे ३० विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले होते. या घटनेनंतर राज्यात बंदुकीबाबत लोकांमध्ये संताप वाढला आहे. त्यानंतर रिपब्लिकन गव्हर्नरने राज्यात बंदुकीवर बंदी लागू केली. असा निर्णय घेणारे हे पहिलेच राज्य होते. तेव्हापासूनच या मुद््द्यावर संघर्ष सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...