आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत फ्लोरिडा, कॅलिफोर्नियासह इतर राज्यांत नागरिकांना दुहेरी तडाखा सहन करावा लागत आहे. वादळांना १ जून पासून सुरुवात झाली आहे. अमेरिकत हवामान बदलामुळे केवळ ग्लोबल वॉर्मिंगच नव्हे तर विमा संकटही वेगाने वाढू लागले आहे. जून महिना वादळांचा महिना म्हणून ओळखला जातो. वादळानंतर घरांच्या उभारणीच्या कामांवर विमा कंपन्यांना जास्त खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीचा फायदा घेऊन वेगाने नुकसान भरपाईचे बोगस दावे करणारेही वाढतात. त्यातून विमा कंपन्यांसमोरील अडचणीत आणखी वाढ होते. परिणामी अमेरिकेतील विमा बाजार संकटात सापडला आहे. म्हणूनच विमा कंपन्यांनी प्रीमियममध्ये वाढ केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रीमियमच्या रकमेत २५ टक्क्यांनी वाढ केली. अनेक नागरिक नुकसानीची जोखीम लक्षात घेऊन घरांचा विमा काढण्यासाठी कंपन्यांचा शोध घेत आहेत. वादळाच्या वेळी होणाऱ्या नुकसानीची भरपाई आणि विम्याची रक्कम मिळवण्याच्या नावाखाली होणारी फसवणूक यामुळे विमान कंपन्यांना दोन्ही बाजूने फटका बसू लागला आहे. इलिनॉइस विद्यापीठातील आपत्ती व्यवस्थापन व विमा कार्यालयाचे संचालक लिन मॅकक्रिस्टियन म्हणाले, अमेरिकेत संवेदनशील ठिकाणी राहणाऱ्यांना दुहेरी संकट झेलावे लागते. सरकारने विमा कंपन्यांना दिलासा देण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
इमारतींना अपग्रेड करण्यासाठी ७.७ लाखांची मदत
घरांना अपग्रेड करणे व वादळाचा मुकाबला करण्यालायक करण्यासाठी घरांच्या मालकांना नगदी १० हजार डॉलर (सुमारे ७.७ लाख रुपये) एवढी भरपाई द्यावी. सोबतच हवेचा दबाव सहन करणारी संरचना तयार करावी लागेल. तसे केल्यास दिलासा मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.