आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Just 10 Words Will Tell The Creativity In You, The More Ways You Can Do A Task, The More Creative You Are

संशोधन:केवळ 10 शब्द सांगतील तुमच्यातील सर्जनशीलता, एखादे कार्य जितक्या पद्धतींनी करू शकता तितके तुम्ही क्रिएटिव्ह

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही किती सर्जनशील आहात हे जाणून घेण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी नवी पद्धत शोधली आहे. ४ मिनिटांत तुम्ही स्वत: आपली चाचणी करू शकता. अट एवढीच आहे, चाचणी कसे काम करते हे तुम्हाला माहीत नसावे. शास्त्रज्ञांनी याला डायव्हर्जंट असोसिएशन टास्क (डीएटी) असे नाव दिले. सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनाद्वारे ही पद्धत कळली. मानसशास्त्रज्ञांनी ८९१४ सहभागींवर संशोधन केल्यानंतर ही पद्धत शोधली. हार्वर्ड विद्यापीठाचे मानसशास्त्रज्ञ जे. ओल्सन सांगतात, डीएटी टेस्ट स्वत: परिपूर्ण नाही, पण एखाद्याच्या सर्जनशीलतेची पातळी जाणण्यासाठी आतापर्यंत अवलंबलेल्या २ प्रमुख पद्धतींपेक्षा खूप चांगली आहे.

शास्त्रज्ञांकडे एखाद्याच्या सर्जनशीलतेची पातळी मोजण्याच्या ३ प्रमुख पद्धती आहेत भिन्नता किती अर्थपूर्ण डायव्हर्जंट असोसिएशन टास्कमध्ये व्यक्तीला १० संज्ञावाचक शब्द लिहायला सांगितले जाते.जे एकमेकांपेक्षा जितके वेगळे व असामान्य शब्द लिहितील ते तितकेच क्रिएटिव्ह असतात. कारण ते तितक्याच नव्या पद्धतीने विचार करू शकतात. उदाहरणार्थ कुत्रा व पुस्तक लिहिणारे कुत्रा-मांजर लिहिणाऱ्यांपेक्षा जास्त क्रिएटिव्ह असतील. कारण मांजर आणि कुत्रा मिळते-जुळते शब्द आहेत. मात्र, कुत्रा व पुस्तकाचा मेळ लागत नाही. १० शब्द एकमेकांपेक्षा जितके सखोल, अर्थपूर्ण व असामान्य असतील व्यक्ती तितकीच क्रिएटिव्ह होईल.

प्रयोगशीलतेला न्याय द्या सर्जनशीलतेची पातळी मोजण्यासाठी अल्टरनेटिव्ह युजेस टास्क प्रणालीत एखादी वस्तू दिली जाते. ती वीट, झाडू, रिक्षा, पाणी, लोटा किंवा काहीही असू शकते. त्यानंतर तुम्हाला या वस्तूंचे अधिकांश वापर सांगायचे असतात. तुम्ही त्या वस्तूच्या जितक्या जास्त वापरांचा विचार करू शकाल, तितकेच तुम्ही अधिक क्रिएटिव्ह गणले जाल. वस्तूच्या वापराच्या अनेक कल्पना हास्यास्पदही असू शकतात. मात्र, त्या तुमची क्रिएटिव्हिटी सांगतात.

कल्पनाशक्तीचा टास्क सर्जनशीलतेची पातळी मोजण्याची तिसरी पद्धत ब्रिज द असोसिएटिव्ह गॅप टास्क आहे. यात गॅप भरायचा असतो. भारतीय लष्कराच्या एसएसबी टेस्टदरम्यान सर्वप्रथम सर्जनशीलता टेस्ट याच प्रणालीद्वारे केली जाते. यात चित्रे दाखवली जातात. ही चित्रे जोडून एक कथा तयार करावी लागते. या कथेतून तुमची सर्जनशीलता आणि विचार करण्याची शक्ती कळते. या प्रणालीअंतर्गत दोन शब्द तिसऱ्या शब्दाशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो. हे दोन शब्द कशा प्रकारे जोडण्यात आले यावरून तुमची क्रिएटिव्हिटी कळते.

बातम्या आणखी आहेत...