आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Kabul Airport Blast Pakistan Connection; Afghanistan News | ISIS Terrorist Claims Responsibility For HKAIA Attacks

काबुल ब्लास्टचे पाकिस्तान कनेक्शन:ISIS-K चा प्रमुख अस्लम फारुकी पाकिस्तानी; लष्करशी संबंध असल्याची दिली आहे कबुली, तालिबानी राजवटीमुळे तुरुंगातून सुटला

काबुल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ISIS-K ने हल्ल्यानंतर फिदायीनचा फोटो प्रसिद्ध केला

काबूल विमानतळावरील फिदायिन हल्ल्याचे मूळ पाकिस्तानात आहे. ISIS खुरासान अर्थात ISIS-K ने या स्फोटांची जबाबदारी स्वीकारली आहे ज्यात 100 हून अधिक लोक मारले गेले. या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मावलावी अब्दुल्ला उर्फ ​​अस्लम फारुकी आहे. फारुकी हा पाकिस्तानी नागरिक आहे आणि त्याने तेथूनच खुरासानचा प्रमुख बनण्याचा प्रवास सुरू केला. तो लष्कर आणि तहरीक सारख्या बंदी घातलेल्या संघटनांशीही संबंधित होता. अफगाण एजन्सींनी त्याला अटक केली तेव्हा त्याने हे कबूल केले होते. म्हणजेच काबुल विमानतळाच्या स्फोटाचे मूळ पाकिस्तानातच आहे, जाणून घ्या कसे...

ISIS-K ने हल्ल्यानंतर फिदायीनचा फोटो प्रसिद्ध केला
हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावर म्हणजेच काबूल विमानतळावर गुरुवारी संध्याकाळी दोन आत्मघातकी हल्ले झाले. यानंतर, ISIS-K ने त्याच्या एका फिदायीन हल्लेखोराचे नाव आणि फोटो जारी केला. त्याचे नाव अब्दुल रहमान अल लागोरी असे होते. तालिबानने सांगितले की हीच व्यक्ती विमानतळावरल सुरक्षादलांना चकमा देऊन आत शिरली.

तालिबानने काबुल एअरपोर्टवरील हल्ल्यानंतर आपल्या फियादीनचा फोटो जारी केला.
तालिबानने काबुल एअरपोर्टवरील हल्ल्यानंतर आपल्या फियादीनचा फोटो जारी केला.

अमेरिकेचे सैनिक आणि सहयोगी निशाण्यावर होते
तालिबानने सांगितले की हल्ल्यात आम्ही अमेरिकन सैनिक आणि त्यांच्या अफगाण सहयोगींना लक्ष्य केले. ते लोकही निशाण्यावर होते ज्यांना आम्ही हेर म्हणून संशयीत होते. तालिबान हे आमचे लक्ष्य नव्हते.

काबूलमधील गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यामागे देखील ISIS-K प्रमुख
27 मार्च 2020 रोजी काबुल गुरुद्वारामध्ये स्फोट झाला. या हल्ल्यात 26 अफगाण शीख आणि एक भारतीय शीखचा मृत्यू झाला. यानंतर, 4 एप्रिल 2020 रोजी, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाने (NDS) फारुकीला नांगरहार प्रांतातून अटक केली होती. अफगाणिस्तानच्या एजन्सीनुसार, फारुकीचा या हल्ल्यात सहभाग होता.

जलालाबाद आणि रावळपिंडी लिंक स्वीकारली
फारुकीने चौकशीदरम्यान कबूल केले की तो यापूर्वी हक्कानी नेटवर्कसह काबूल आणि जलालाबाद येथून कार्यरत असलेल्या लष्कर-ए-तोयबाशी संबंधित होता. ISIS-K मध्ये सामील होण्यापूर्वी तो तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानमध्ये सामील झाला. यानंतर मावलावी जिया-उल-हक उर्फ ​​अबू उमर खोरासानी नंतर ISIS-K चा प्रमुख झाला.

फारुकी पाकिस्तानच्या खैबरपख्तूनख्वा प्रांतातील ओराकजई जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो मोमाजाई कुळातील आहे. त्याला 4 पाकिस्तानी नागरिकांसह अफगाण एजन्सींनी अटक केली होती. फारुकीने एजन्सींना सांगितले होते की ISIS-K ची मुळे पाकिस्तानच्या रावळपिंडीमध्ये आहेत. यानंतर त्याची रवानगी बगराम तुरुंगात करण्यात आली, पण अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर फारुकीची इतर कैद्यांप्रमाणेच सुटका झाली.

फारुकीला त्याच्या स्वाधीन करावे अशी पाकिस्तानची इच्छा होती
फारुकीबद्दल एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की जेव्हा भारताने त्याच्या चौकशीची विनंती केली तेव्हा ती नाकारण्यात आली, परंतु पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानच्या मुत्सद्द्याला बोलावून फारुकीला सोपवण्याची मागणी केली होती. असे मानले जाते की अफगाणिस्तान आणि इतर संस्थांच्या चौकशीदरम्यान फारुकी पाकिस्तानशी असलेल्या संबंधांबद्दल सर्व काही सांगेल अशी भीती पाकिस्तानला होती.

त्याला याबद्दल कधीही प्रश्न विचारला गेला नाही. अफगाणिस्ताननेही पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली आणि म्हटले की फारुकीवर अफगाणिस्तानच्या कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...