आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Kabul Airport Bomb Blast; Latest Updated Photos From Afghanistan Hamid Karzai Airport; News And Live Updates

काबूलमधील सर्वनाशाचे 15 फोटो:फिदाईन हल्ल्यानंतर रक्ताने माखल्या भिंती; रस्त्यापासून हॉस्पिटलपर्यंत फक्त किंचाळ्या

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमानतळावरून 16 तासांनी विमान सेवा सुरु करण्यात आली

तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवताच देशात प्रचंड हाहाकार उडाला आहे. अफगाणी नागरिक चिंतेत असून मिळेल त्या विमानाने दुसऱ्या देशात जात आहे. काबूल विमानतळावरही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. विशेष म्हणजे तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर ताबा मिळवताच 13 व्या दिवशी फिदाईन हल्ला झाला. दरम्यान, या हल्ल्यात 13 अमेरिकन सैन्यांसह 169 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 1,277 लोक जखमी झाले आहे. या घटनेमुळे अनेक लोक चिंतेत असून भीतीखाली वावरत आहे. हल्ल्यातील काही लोकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास विमानतळावरून 16 तासांनी विमान सेवा पुन्हा सुरू झाली. यामुळे पुन्हा एकदा विमानतळावर गर्दी होण्याची शक्यता आहे. गुरुवारच्या घटनेनंतर या ठिकाणी शोककळा पसरली आहे. हल्ल्यात ज्या ठिकाणी स्फोट झाले त्या ठिकाणच्या भींती रक्ताने माखल्या आहेत. जिथे नजर जाईल तिथे फक्त लोकांच्या कपड़यांचे चिंध्या, सामान आणि पादत्राणे विखुरलेली दिसतात. रस्त्यापासून हॉस्पिटलपर्यंत लोक आपल्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. सर्वत्र आरडाओरड ऐकू येत आहे. काबूलमधील सर्वनाशाचे पहा 15 फोटो...

काबूल विमानतळाला लागून असलेल्या भिंतींवर रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसतात.

विमानतळाच्या बाहेर जिथे लोकांची गर्दी होती तिथे कपडे आणि पादत्राणे दिसत आहे.

देश सोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या पिशव्या आणि पाण्याच्या बाटल्याही रक्ताने माखलेल्या होत्या.

स्फोटानंतर झालेल्या गोंधळात अनेक लोक आपले जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते.

लोकांचे कपडे भिंतीवरील काटेरी तारांमध्ये अडकले होते. स्फोटानंतर लोक त्यांचे प्राण वाचवण्यासाठी या तारांवर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते असे या फोटोवरुन दिसून येते.

स्फोटात आपल्या प्रियजनांना गमावल्यानंतर कुटुंबाला मृतदेह एका पिशवीत देण्यात आला.

या स्फोटात अनेक मुलांनी त्यांचे पालक गमावले. काबुलमधील रुग्णालयातून आपल्या बापाचा मृतदेह घेऊन जाताना मुलगा.

रुग्णालयाबाहेर मृतदेह बॅगमध्ये ठेवण्यात आले आहेत. नातेवाईक येथे येऊन त्यांची ओळख पटवत आहेत.

सशस्त्र तालिबान लढाऊ शहरातील यंत्रणा हाताळण्यात व्यस्त आहेत.

स्फोटाच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा ज्या नाल्यात मृतदेह होते तेथे जमाव होता. लोकांना त्यांच्या पासपोर्ट-व्हिसाची पडताळणी झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे देश सोडायचा आहे.

विमानतळाला लागून असलेला हाच तो नाला आहे, ज्यामध्ये मृतदेह होते. आज पुन्हा एकदा येथे लोकांची गर्दी पाहायला मिळाली.

रुग्णालय जखमींनी खचाखच भरले आहे. नातेवाईक आपल्या प्रियजनांच्या बरे होण्याची वाट पाहत आहेत.

स्फोटात अनेकांनी हात पायही गमावले. एका रुग्णालयात उपचार करत असताना डॉक्टर

बातम्या आणखी आहेत...