आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 फोटो:काबुल विमानतळावर झालेल्या रक्तपाताची दाहकता दाखवणारे फोटो, दोन आत्मघातकी हल्ल्यांमध्ये गेला अनेकांचा जीव

काबुल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी संध्याकाळी दोन आत्मघाती हल्ले झाले. यामध्ये 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर 200 हून अधिक लोक जखमी झाले. या हल्ल्यांनी संपूर्ण काबूल हादरले.

विमानतळाबाहेर स्फोट झाले आणि हवेत धूळ उडाली. जोपर्यंत धूर कमी झाला, तोपर्यंत अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. सगळीकडे रक्त होते. लोक आपल्या जखमी नातेवाईकांना रुग्णालयात नेण्यासाठी धडपड करत होते.

तालिबानच्या क्रूर राजवटीपासून आपला जीव वाचवण्यासाठी इतर देशांमध्ये निर्वासित होण्यास इच्छुक असलेले लोक आणि काबूल विमानतळावर गेल्या अनेक दिवसांपासून थांबले होते. हे लोक वाट पाहत होते की काही देश त्यांना आश्रय देईल. त्यांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले जाईल, परंतु बर्‍याच लोकांची प्रतीक्षा पूर्ण होऊ शकली नाही.

काबूल विमानतळावरील हल्ल्याची दृष्य हृदय पिळवटून टाकणारी आहेत, परंतु ही चित्रे दाखवण्याचा हेतू केवळ अफगाणिस्तानमधील वेदना आणि भीतीची कहाणी आहे, हे काल्पनिक नाही.

दोन आत्मघाती हल्ल्यानंतर विमानतळालगतच्या नाल्यात मृतदेह आणि जखमींचा ढीग साचला होता. लोकांना बाहेर काढल्यावर नाल्यातील पाणी लाल झाले.

काबूल स्फोटात जखमी झालेल्यांना गोंधळात रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक जखमी रुग्णालयात उपचाराची वाट पाहत आहे.

विमानतळावर झालेल्या हल्ल्यामुळे दोन मुले घाबरून रडत आहेत. या हल्ल्यात 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

काबूल विमानतळाबाहेर हजारो लोक उपस्थित होते. गर्दीच्या दरम्यान दोन आत्मघाती हल्लेखोरांनी स्वतःला उडवून दिले.

कारमध्ये पडलेल्या जखमी व्यक्तीकडे पाहणारी एक महिला आणि एक मूल. या हल्ल्यात अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत.

काबूल विमानतळाबाहेर तालिबानी चौक्यावर तालिबानी उभा आहे.

लोक हल्ल्यात जखमी झालेल्या एका व्यक्तीला रुग्णालयात घेऊन जाताहेत. काबूल हल्ल्यात 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक रुग्णालयात मृतदेह ठेवत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेणारे लोक. लोकांनी आपल्या प्रियजनांना लोट-गाड्यांमध्ये रुग्णालयात नेले.

ISIS-Kabul ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जखमींना रुग्णवाहिकेत घेऊन जाणारे लोक.

काबूल विमानतळावरील हल्ल्यानंतचे दृष्य.
काबूल विमानतळावरील हल्ल्यानंतचे दृष्य.
स्फोटात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा हात धरून रुग्णालयात जाताना एक जखमी.

अनेकांना पायी चालत रुग्णालयाच्या दिशेने जावे लागले.

काबूलमधील रुग्णालयाबाहेर स्ट्रेचरवर जखमी व्यक्तीला घेऊन जात असलेले लोक.

हल्ल्यानंतर तालिबानी विमानतळाजवळ रक्षण करताना

अॅबे गेटजवळील बॅरन हॉटेल कॉम्प्लेक्समध्ये बसलेले अफगाण शरणार्थी

गुरुवारी झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणावरील बॅरन हॉटेलजवळ तैनात ब्रिटिश सैनिक

बातम्या आणखी आहेत...