आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालिबानने ताब्यात घेतल्यानंतर 26 ऑगस्ट रोजी काबूल विमानतळावर झालेल्या फिदायीन हल्ल्यात सुमारे 200 लोक मारले गेले. आता या प्रकरणी नवीन खुलासे होत आहेत. रविवारी, अशी माहिती समोर आली की स्फोट घडवणाऱ्या फिदायीन हल्लेखोराला 5 वर्षांपूर्वी भारतातून हद्दपार करण्यात आले होते. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) शी जोडलेल्या एका नियतकालिकात हा दावा करण्यात आला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, अब्दुल रहमान अल लोगारी असे फिदायीन हल्लेखोराचे नाव होते.
त्याला दिल्लीतून अटक करण्यात आल्याचे मासिकामध्ये सांगण्यात आले आहे. काश्मीरमध्ये भारत सरकारच्या कारवाईच्या निषेधार्थ त्याला हिंदूंना लक्ष्य करायचे होते. अब्दुलने अफगाणिस्तान स्फोटांसह 250 हून अधिक लोकांना ठार मारल्याचा दावा मासिकाने केला आहे.
रॉने अमेरिकन सैन्याच्या ताब्यात दिले होते
दहशतवादी संघटनेच्या नियतकालिकानुसार, अब्दुल अफगाणिस्तानातून आला होता आणि दिल्लीच्या लाजपत नगर भागात भाड्याने खोली घेऊन राहत होता. 2017 मध्ये, सुरक्षा संस्थांना त्याच्या इस्लामिक स्टेटशी संबंधांबद्दल माहिती मिळाली होती.
सुरक्षा यंत्रणांनी त्याला अटक करुन अफगाणिस्तानात डिपोर्ट केले होते. येथे अमेरिकन लष्कराने अब्दुलला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर अमेरिकन सैन्याने शोध मोहीम राबवून IS चे अनेक तळ नष्ट केले होते.
पाकिस्तानमध्ये घेतली होती दहशतवाद्यांची ट्रेनिंग
मासिकामध्ये असे म्हटले आहे की, अनेक अफगाणी नोकरशहा काबूल विमानतळाद्वारे देश सोडून जात होते. या लोकांनी अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांना मदत केली होती. म्हणूनच अब्दुलला विमानतळावर स्फोट करण्यास सांगितले होते.
अब्दुलची 2018 मध्ये अमेरिकन संस्थांनी चौकशी केली होती. त्यावेळी तो 20 वर्षांचा होता. तो अफगाणिस्तानातील एका श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता. अब्दुल इस्लामिक स्टेटच्या 12 दहशतवादी संघटनांशी संबंधित होता. त्याला पाकिस्तानमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
दिल्लीतील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली होती
दुबईहून अफगाणिस्तानातील एका बँक खात्यात अचानक 50 हजार डॉलर्स जमा झाल्यावर रॉला अब्दुलचा संशय आला. या वेळी अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने भारताला दिल्लीतील संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत गुप्तचर माहिती दिली. भारतीय सुरक्षा संस्थांनी नियतकालिकात केलेले दावे स्वीकारले नाहीत, परंतु ते नाकारलेही नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.