आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये चीनी हॉटेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका रेस्टॉरंट आणि गेस्ट हाऊसवर हल्ला झाला आहे. काही माध्यमांतून मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलमध्ये अनेक चिनी नागरिक उपस्थित आहेत. या संदर्भातील काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये हॉटेलच्या एका भागात आग लागलेली दिसून येत आहे. तर आतून गोळीबार केला जात आहे.
दरम्यान, तालिबान सरकार किंवा चीनच्या दूतावासाने या प्रकरणी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. काही माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, हॉटेलमध्ये काही आत्मघातकी (दहशतवादी) हल्लेखोर उपस्थित आहेत. अशा परिस्थितीत तालिबानच्या सुरक्षा दलांना आत जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे.
2 आठवड्यापूर्वी पाकिस्तानच्या दूतावासावर गोळीबार
वृत्तानुसार, हॉटेलमधून गोळीबाराचे आवाज येत आहेत. चीनचे अनेक राजकिय व प्रशासनीक अधिकारीही या हॉटेलमध्ये येतात. हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा चीनच्या राजदूताने शुक्रवारी तालिबान अधिकाऱ्यांशी काबूलमधील आपल्या दूतावासाच्या सुरक्षेबाबत चर्चा केली होती. दोन आठवड्यांपूर्वी याच भागात पाकिस्तानच्या दूतावासावर गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये एक पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी जखमी झाले आहेत. सोमवारच्या हल्ल्याबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.
इमारतीचे नाव चायनीज हॉटेल का
मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलचे खरे नाव शेर-ए-नंबर आहे. इथून काही मीटर अंतरावर एक गेस्ट हाऊस आहे आणि बहुतेक चिनी नागरिक आणि मुत्सद्दी इथे येतात. त्यामुळे या हॉटेलचेच नाव चायनीज हॉटेल झाले. या इमारतीत स्नूकर हॉल आणि स्विमिंग पूलसारख्या सुविधाही आहेत. सध्या या हॉटेलमधून आग आणि धुराचे लोट उठताना दिसून येत आहेत. याशिवाय बंदुकीच्या गोळीबाराचे आवाज सतत येत आहेत.
मोठा स्फोट झाला
न्यूज एजन्सी APने एका प्रत्यक्षदर्शीचा हवाला देत सांगितले की, हॉटेलमध्ये मोठा स्फोट झाला. यानंतर आग लागली. चीन आणि अफगाणिस्तानमध्ये 76 किलोमीटर लांबीची सीमा आहे. तालिबान सत्तेवर आल्यानंतर येथे चिनींचा वावर वाढला आहे. चीन लोक येथे मूळ धरू पाहत आहे.
अफगाण तालिबान आणि ISIS खोरासान गट चीनमधील उइगर मुस्लिमांना मदत करू शकतात, अशी भीती चीन सरकारला वाटत आहे. त्यामुळे जिनपिंग सरकार तालिबान सरकारला खुश ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या दूतावासावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी ISISच्या खोरासान गटाने स्वीकारली होती.
हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतली नाही
चिनी हॉटेलवर सोमवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. चीनला अफगाणिस्तानातील तांब्याच्या खाणी अतिशय शांतपणे ताब्यात घ्यायच्या आहेत. त्यामुळे काही स्थानिक गटही त्यावर नाराज असल्याचे मानले जात आहे.
भारतीय दूतावासही निशाण्यावर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.