आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कमला हॅरिस म्हणजे आमची ‘मोमाला’, जगातील सर्वात बेस्ट सावत्र आई, तिने डॅडी ‘डग’ यांनाही सर्वोत्कृष्ट कुक बनवले

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकी उपराष्ट्राध्यक्ष हॅरिस यांची मुलगी व मुलाने आईविषयी सांगितल्या खास गोष्टी

जेसिका बेनेट
२६ वर्षीय कोल आणि २१ वर्षीय इला हे प्रसिद्ध विधिज्ञ डग्लस एमहॉफ यांची मुले आहेत हे नोव्हेंबरपूर्वी अमेरिकेतील लोकांनाही माहिती नव्हते. अर्थात, अमेरिकी उपराष्ट्राध्यक्ष कमलादेवी हॅरिस त्यांची आई आहे. दोन्ही मुले डग्लस यांच्या पहिल्या पत्नीची आहेत. हे कुटुंब एकत्र राहते. परंतु आई कमलास हे दोघे ‘मोमाला’ नावाने हाक मारतात, तर वडिलांना ‘डग’ म्हणतात. मुले म्हणतात, ‘मोमाला जगातील सर्वात बेस्ट सावत्र आई आहे.’ बायडेन आणि कमला हॅरिस यांची उमेदवारी घोषित झाली त्या वेळी संपूर्ण कुटुंब व्यासपीठावर हजर होते. सर्वांनीच आतषबाजीचा आनंद लुटला. कोला आणि इला यांनी ‘झूम’च्या माध्यमातून सदर प्रतिनिधीशी बातचीत केली. त्या वेळी कोलने आई कमला हिचाच राखाडी रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला होता. कोल म्हणाला, आई शपथ सांगतो, सध्या माझ्याकडे हाच एकमेव स्वच्छ टी-शर्ट आहे. डग्लस आणि कमला हे जोडपे कसे आहे? असे विचारल्यावर तो म्हणाला, दोघेही एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात. त्यांचे एकमेकांबद्दलचे आकर्षण कधीही कमीच होणार नाही असे वाटते. त्यावर इला म्हणते की, दोघांकडे पाहून असे वाटते की ते एकमेकांच्या अखंड प्रेमात बुडालेले आहेत.

कोल म्हणाला की, टीव्ही चॅनल्सवर आई-वडिलांना पाहणे जर विचित्रच वाटते. पण मला ते आवडते. आम्ही भावंडांनी कधीही राजकारण केले नाही, पण आता त्याची सवय होते आहे. इला म्हणते, आपल्या आई-वडिलांचे नाव सांगताना कधी-कधी अवघडल्यासारखे होऊन जाते. आता राजकारण समजून घेत आम्ही मोठे होत आहोत.

आई आल्यापासून घरचे जेवण मिळतेय, पूर्वी रेस्टॉरंटमधून मागवत होते
कोल म्हणतो, माध्यमिक शाळेत शिकताना आई आणि वडील वेगळे झाले. त्या वेळी बहुतांश वेळा रात्रीचे जेवण रेस्टॉरंटमधून मागवत होतो किंवा सँडविच खाऊन झोपावे लागत होते.पण मोमाला घरात आल्यानंतर तिने डग यांना उत्तम स्वयंपाकी बनवले. ती आल्यानंतर घरचे जेवण तर मिळालेच शिवाय एक सर्वोत्तम कुकही मिळाला.