आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्षाची महाशपथ:महाशक्तीच्या महत्त्वाच्या निर्णयांवर कमला यांची असेल अंतिम मोहोर

वॉशिंग्टनहून दिव्य मराठीसाठी मोहंमद अली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बायडेन यांच्या कॅबिनेटच्या सर्व नियुक्त्या कमला हॅरिस यांनी केल्या आहेत, नॅशनल सिक्युरिटीचे कामही त्या पाहतील

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन आणि उपाध्यक्षा कमलादेवी हॅरिस यांच्या शपथविधीनंतर कमला यांची भूमिका महत्त्वाची असेल, त्यांचा प्रभाव अनेक कारणांमुळे बायडेन यांच्याहून अधिक असेल. कमला यांच्या कार्यालयाने दै. भास्करला सांगितले की, आतापर्यंत बायडेन यांनी तज्ज्ञ तसेच कॅबिनेट सदस्यांच्या नियुक्तीसाठी ज्यांची नावे निवडली त्यात कमला यांची भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांचा बायडेन प्रशासनावर असलेला प्रभाव स्पष्ट दिसतो. बायडेन यांनी आतापर्यंत दोन डझनहून अधिक भारतीय अमेरिकींना उच्च पदे दिली आहेत. कॅपिटल हिलचे नेते-अधिकारी तर जाहीरपणे हे निर्णय कमलांचे असल्याचे सांगत आहेत. अमेरिकी लोकसंख्येत केवळ १ टक्का असलेल्या भारतीय अमेरिकींसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे.

आता अर्थव्यवस्थेचा कायापालट करणे, कोरोनाशी दोन हात, कार्बन उत्सर्जन तसेच वांशिक न्यायासारख्या मुद्द्यांवरील निर्णयांत कमला महत्त्वाच्या ठरतील. कमलांच्या सहकाऱ्यानुसार, बायडेन यांनी प्रेसिडेंट ऑफिसला स्पष्ट आदेश दिले आहेत की, प्रमुख निर्णयांमध्ये कमलांचा निर्णय अंतिम असेल. एका मुलाखतीत बायडेन म्हणाले, एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावेळी मी उपलब्ध नसेन तर मला कमलांवर पूर्ण विश्वास आहे.

बायडेन विविध बैठकांत निर्णय घेण्यासाठी सर्वात अगोदर कमला यांचे मत आजमावतात. दोघे फोनवर सतत संवाद साधतात. सिनेटच्या धोरणात्मक बैठकांत कमला असतील. कमला यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि धाेरणात्मक मुद्द्यांवरही महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल. अमेरिकेचे प्रसिद्ध इितहासकार डग्लस ब्रिंक्ले म्हणतात, “बायडेन आणि कमला यांचे संबंध ट्रम्प-माइक पेन्स यांच्या संबंधांपेक्षा वेगळे असतील. कृष्णवर्णीय असल्यामुळे त्यांचा प्रभाव अमेरिकेत महत्त्वाचा ठरेल.

शपथविधीच्या निमंत्रण पत्रिकेत नाव लिहिले - उपाध्यक्षा कमलादेवी हॅरिस

कमला हॅरिस म्हणाल्या की, ''आज एक नवा अध्याय सुरू झाला आहे. मी आज येथे एका महिलेमुळेच (आई श्यामला) आहे. कारण, ती माझ्यापूर्वी अमेरिकेत आली होती.''

बातम्या आणखी आहेत...