आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Karachi Terror Attack Updates | Pakistan Stock Exchange Terrorists Attack Today Updates In Latest Pictures From Karachi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कराची स्टॉक एक्सचेंजवरील हल्ल्याचे फोटो:ग्रेनेड आणि एके-47 घेऊन कारमध्ये आले होते 4 दहशतवादी, दीड वर्षापूर्वी चिनी दूतावासावर बलूच दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे केला होता हल्ला

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या हल्ल्यात 9 लोक मारले गेले, यामध्ये दहशतवाद्यांसह चार सुरक्षा कर्मचारी आणि एका उपनिरीक्षकाचा समावेश
  • मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजवर सकाळी सुमारे 10 वाजता हल्ला झाला

पाकिस्तानातील कराची येथील स्टॉक एक्सचेंजमध्ये सोमवारी सकाळी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. सुरक्षादलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. हे चारही दहशतवादी एका गाडीतून येथे पोहचल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी स्टॉक एक्सचेंजमध्ये जाण्यापूर्वी मेन गेटवर हँड ग्रेनेड फेकले, नंतर लोकांवर गोळीबार केला. 

चार दहशतवादी याच गाडीतून हल्ला करण्यासाठी आले होते. सुरक्षादलांनी सर्व दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. अतिरेकी स्टॉक एक्सचेंजच्या पार्किंगमधून घुसण्याचा प्रयत्न करत होते. तेथे उपस्थित लोकांचे म्हणणे आहे की दहशतवाद्यांकडे बॅगमध्ये ग्रेनेड आणि हातात अॅटोमॅटिक बंदूक होती.

दहशतवादी आल्यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. इमारतीला चारही बाजूंनी घेरले. या हल्ल्यात चार सुरक्षा कर्मचारी आणि एक उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला.

घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलिस तैनात केले आहेत. सोमवारी शेअर बाजारात गर्दी कमी होती. येथे सहसा 6 हजार लोक उपस्थित असतात.

दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि ग्रेनेड होते. पोलिसांनी सर्व जप्त केले आहेत.

बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 2018 मध्ये कराचीमधील चिनी दूतावासावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी देखील बलूच आर्मीने घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...